आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Separate Clusters For Settlement Of Kashmiri Pandits: J K CM Mufti

काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत नाही : मुफ्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती निर्माण करण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. अशा प्रकारचा कोणताच निर्णय घेतला जाणार नसल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. तत्पूर्वी, जम्मू-काश्मीरच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून त्यांच्या या बयाणापूर्वी प्रचंड गोंधळ घातला.

याचदरम्यान मुफ्ती सईद यांनी या मुद्द्यावरील आपली बाजू स्पष्ट केली. "आम्ही काश्मीर खोर्‍यातील काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती बनवणार नाहीत, असा मी विश्वास देतो. खोर्‍यातील पंडितांनाच स्वतंत्र वसाहतीत राहायची इच्छा नाही. त्यामुळे इस्रायलप्रमाणे स्वतंत्र वसाहती निर्माण करण्याचा आमचा कोणताच मानस नाही. राज्यातील वातावरण खराब करण्याच्या हेतूनेच अफवा पसरवण्यात आली आहे,' असे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, खोर्‍यात परत येणार्‍या काश्मिरी पंडितांसाठी चांगले वातावरण तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
फुटिरतावाद्यांनी या मुद्यावर राजकारण करायला नको.

दरम्यान, मंगळवारी सईद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतरच विस्थापित काश्मीरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन केली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. शिवाय, यासाठी लवकरच भूसंपादन केले जाईल, असेही म्हटले जात होते. विरोधकांनी या मुद्यावर तीव्र आक्रोश व्यक्त केला होता.

६२हजार काश्मीरी पंडित विस्थापित : जम्मूकाश्मीरातील ६२ हजारांपेक्षा जास्त पंडित दिल्लीसह देशातील अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. १९८९ मध्ये काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या पंडितांनी विस्थापित म्हणून जगायला सुरुवात केली.

दोन्ही समुदायांना विश्वासात घ्या : भाजप
दरम्यान,विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती अथवा त्यांच्या एकत्रित राहण्याच्या वादाबाबत थोडे धैर्य बाळगायला हवे. या समस्येचे निराकरण किमान समान कार्यक्रमांतर्गत केले जाईल, असे भाजपचे महासचिव राम माधव यांनी गुरुवारी दिल्लीत सांगितले. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजपत या विषयावर चर्चा सुरू आहे. दोन्ही समुदायांना विश्वासात घेतल्यानंतरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही माधव या वेळी म्हणाले.