आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट नोकरीसाठी ‘नो स्मोकिंग’अनिवार्य; राजस्थान सरकारचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- राजस्थानमध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी यापुढे ‘धूम्रपान करत नाही, गुटखा खात नाही’ अशी हमी द्यावी लागणार आहे. उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत अशा प्रकारची लेखी हमी दिल्यानंतरच त्यांचा नियुक्तीसाठी विचार केला जाणार आहे.

थेट नोकरभरतीच्या प्रक्रियेत हा नियम अनिवार्य करण्यात आल्याचे राजस्थान सरकारने स्पष्ट केले. यासंबंधीचा अध्यादेश ऑक्टोबर 2013 मध्येच काढण्यात आला होता; परंतु त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. नंतर लोकसभा निवडणूक झाली; परंतु अध्यादेश विविध विभाग, आयोग, जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना झाला आहे. धूम्रपान करत नसल्याचे आणि गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करत नसल्याची हमी अर्जासोबत लेखी स्वरूपात देणे बंधनकारक करण्यात आली आहे. अलीकडेच वीज क्षेत्रातील पाच सार्वजनिक कंपन्यांनी त्यावर काम करण्यासाठी पुढाकार घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे अस्थमा केअर सोसायटीचे धर्मवीर केटेवा यांनी सांगितले.