आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nobel Laureate Says, Invent And Discover In India’ Rather Than ‘Make In India

देशाला डिस्कव्हर इन इंडियाची जास्त आवश्यकता : नोबेल विजेते शास्त्रज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूर- नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांनी भारताला सल्ला देत मेक इन इंडिया ऐवजी डिस्कव्हर इन इंडियावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रो. डेव्हिड जे. ग्रास म्हणाले, मेक इन इंडिया भारतासाठी खूप आवश्यक आहे, मात्र ते दुसऱ्यांवर अवलंबून असायला नको. भारताने स्वत:च संशोधन करावयास हवे. संशोधनातूनच जे तुम्ही बनवता ते उत्पादन निघते. डेव्हिड येथे म्हैसूर विद्यापीठात आयोजित सायन्स काँग्रेसमध्ये ते बोलत होते.

प्रो. ग्रास म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये सर्व पंतप्रधानांनी विज्ञानात गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याचे मी ऐकले आहे. मात्र, विज्ञानातील गंुतवणुकीचा आलेख जशास तसा आहे. त्यात कसलीच वाढ झालेली दिसत नाही. इस्रायलचे प्रो. डेन सेचमॅन यांनीही भारतात यासाठी एक धोरणात्मक योजना आखण्याची आवश्यकता व्यक्त केली. देशाचे पहिले उद्दिष्ट शोध, संशोधन असायला हवे. यासोबत आंत्रप्रेन्योरशिपलाही चालना मिळायला हवी. संशोधनाची सुरुवात िवद्यापीठातून व्हायला हवी. त्यासाठी मुलांना लहान वयापासून विज्ञान शिकवले पाहिजे.

सी.व्ही. रामन रामानुजन यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती : िप्रख्यातशास्त्रज्ञ भारतरत्न प्रो. सीएनआर राव म्हणाले, भारतीयांनी कष्ट घेतले नाहीत तर ते विज्ञान क्षेत्रात पुढे जाऊ शकणार नाहीत. मी विज्ञान क्षेत्रात भारताच्या प्रगतीवर समाधानी नाही. विद्यार्थ्यांमध्ये खडतर परिश्रम घेण्याच्या प्रयत्नातही कमतरता आली आहे. मी संपूर्ण देशात फिरलो आहे. मी अनेक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड पाहिली आहे.

आपल्या गावागावांत अनेक आइन्स्टाइन फॅरेडे आहेत, मात्र त्यांना किती संधी मिळते हा खरा प्रश्न आहे. सी. व्ही. रामन आणि रामानुजन यांनी कठोर परिश्रमातून विज्ञानात नव्या संधी शोधल्या. त्या वेळी कोणत्याही सरकारने त्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. विज्ञानात पैशाची काळजी करू नका. विज्ञानाच्या अभ्यासासाठी मोठे धैर्य लागते.

प्रो. जॉन बी. गार्डन म्हणाले, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भारतातील मुलांमध्ये विज्ञान विषयाची आवड वाढली आहे. विज्ञान तरुणांना ठोस पर्याय देते. विज्ञानात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी सरकारने त्यांची मदत केली पाहिजे. प्रो. सर्ज हेरोश म्हणाले, आपण दुसऱ्यांच्या संशोधनाच्या आधारावर आपले काम धकवून घेण्याचा शॉर्टकट काढण्याची प्रवृत्ती ठेवणार असू तर ते योग्य होणार नाही. देशात चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी गुंतवणुकीत मोठी वाढ होणे आवश्यक आहे.