आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीश रामपालच्या जामिनासाठी कुणी २० हजार रुपयेही देईना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आणि हिस्सारमधील सतलोक आश्रमातील स्वयंघोषित संत बाबा रामपालला सोमवारी जामिनासाठी २० हजार रुपयांची जमवाजमव करणेही शक्य झाले नाही. रामपालच्या वकिलांनी सोमवारी कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रामपालचा जामीन मंजूर केला. मात्र, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या रामपालला जामीन मिळवून देण्यासाठी एकही जामीनदार पुढे आला नाही. त्यामुळे रामपालला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

रामपालविरोधात देशद्रोह, हत्येसह अनेक खटले दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी हजारो समर्थकांसह कोर्ट परिसरात हजर झालेला रामपाल सोमवारी कोर्टरूममध्ये उदास दिसला.

हत्येप्रकरणी कोठडीत वाढ
पोलिसांनी ७ दिवसांच्या कोठडीनंतर रामपालला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रतीक जैन यांच्या कोर्टात सादर केले. त्यानंतर हत्येप्रकरणी ३ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. तत्पूर्वी कोर्टाने त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले होते. रामपालने खासगी कमांडो आणि पोलिसांमधील बाचाबाचीत ६ अनुयायांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी ३ दिवसांची मुदत मागितली होती.