आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास भ्रष्टाचारी, गुन्हेगारांसाठी नॉनसेन्स क्लबची नोटा पार्टी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - लोकसभा निवडणुकीसाठी मतदानापूर्वी 48 तासांपूर्वी नॉनसेन्स क्लबने चंदिगडमधील सेक्टर-17 प्लाझा परिसरात नोटा पार्टीची घोषणा केली. दिवंगत जसपाल भट्टी यांनी नॉनसेन्स क्लबची स्थापना केली होती. त्यांची पत्नी सविता भट्टी यांनी मंगळवारी या पक्षाची स्थापना केली. सविता भट्टी यांना आम आदमी पार्टीने तिकीट दिले होते. काही दिवस प्रचार झाल्यानंतर सविता यांनी तिकीट परत केले आणि पक्षही सोडला. आता त्यांनी नॉनसेन्स क्लबची स्थापना केली आहे. हा क्लब खास भ्रष्टाचार्‍यांसाठी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. किंबहुना भ्रष्टाचार करणे ही या क्लबच्या सदस्यत्वाची प्रमुख अटच आहे.
ज्या अधिकारी किंवा नेत्यांनी कमीत कमी 200 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, तसेच ज्या लोकांविरोधात कमीत कमी 20 गुन्हेविषयक खटले दाखल असतील, असे सर्वजण या क्लबच्या सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतात. सर्व भ्रष्टाचार्‍यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नॉनसेन्स क्लबने नोटा पार्टीची स्थापना केली आहे.
नॉनसेन्स क्लबच्या संस्थापिका सविता भट्टी म्हणाल्या की, या निवडणुकीत प्रथमच नोटाचा (नकाराधिकार) वापर होत असल्यामुळे आम्हाला हा पक्ष स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. भ्रष्टाचार आणि भ्रष्ट लोकांवर सर्वच पक्ष टीका करत आहेत. त्यामुळे ज्या लोकांचे तगडे नेटवर्क असेल, तसेच ज्यांना भ्रष्टाचाराच्या जास्तीत जास्ती युक्ती माहीत असतील, त्यांनाच या पक्षात प्रवेश मिळेल. जेणेकरून त्यांच्या प्रतिभेचा योग्य वापर केला जाईल. सविता भट्टी म्हणाल्या की, या पक्षातील सदस्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. तसेच या पक्षात भ्रष्ट आणि गुन्हेगारांना मान-सन्मान दिला जाईल. इतर राजकीय पक्षांप्रमाणे हा पक्ष धर्म आणि जातीच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवणार नाही. प्रामाणिक विरुद्ध भ्रष्टाचारी असा या पक्षाचा अजेंडा असेल. समाजात प्रामाणिक लोक खूप कमी आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांचा हा पक्ष सहज विजयी होईल, असा त्यांना विश्वास आहे.
नॉनसेन्स क्लबचे सदस्य विनोद शर्मा, गुरतेज तेज आणि मॅड आर्ट्स जसपाल भट्टी फिल्म स्कूलचे विद्यार्थी पॅरोडी गात नोटा पार्टीच्या स्थापनेच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
सदस्यत्वाची अट
200 कोटींचा घोटाळा अन् नावावर 20 गुन्ह्यांची नोंद आवश्यक
पक्षाची पुढील भूमिका
0 निवडणुकीसाठी जाहीरनामा सादर करणार नाही, कारण सर्वच पक्ष जाहीरनाम्यात आपला वेळ वाया घालतात.
0 पक्षाच्या सल्लागार समितीत पहिलवानांचा समावेश करण्यात आला आहे.
0 बूट फेकणारे, नेत्यांच्या कानशिलात लगावणारे, शाई फेकण्यात तरबेज लोकांना प्राधान्य दिले जाईल.
पक्षातर्फे उमेदवारांना डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू एफमधील मल्लांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.