आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nostradamus Predicted Narendra Modi Will Become Prime Minister

450 वर्षांपूर्वीच नास्त्रेदमसने केली होती नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाची भविष्यवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - फ्रेंच ज्योतिषी नास्त्रेदमस यांच्याबाबतीत सर्व जगाला माहिती आहे. त्यांनी आपल्या 'द प्रोफेसीज' या प्रसिद्ध पुस्तकामध्ये अनेक मोठ्या घटनांबाबत भविष्यवाणी केली आहे. प्रसिद्ध स्तंभलेखक फ्रँकोइस गॉटियर यांच्या मते नास्त्रेदमसने भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार याची भविष्यवाणी शेकडो वर्षांपूबर्वीच केली होती.
फ्रँकोईसने त्याच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, प्रसिद्ध फ्रेंच स्कॉलर बॅम्पेरल डे ला रोशफोकॉल्ट यांना एका जुन्या पेटीमध्ये काही जुने दस्तऐवज सापडले होते. ते त्यांनी 1876 मध्ये बोर्दो येथील एका दुकानदाराला विकले होते. बॅम्पेरेल यांच्यामते हे दस्तऐवज लॅटिन भाषेत लिहिलेले होते आणि ते नास्त्रेदमसचे होते. त्यापैकी दोन पानांवर लॅटिन भाषेतील कविताही लिहिलेल्या होत्या.
विशेष म्हणजे नास्त्रेदमसने त्याच्या 'द प्रोफेसीज' या पुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती, अणु हल्ले, अडॉल्फ हिटलर अडोल्फ हिटलर आणि 9/11 च्या हल्ल्याची भविष्यवाणी केल्या होत्या. त्या सर्व ख-या ठरल्या आहेत.

काय आहे, या दस्तऐवजांमध्ये?
नास्त्रेदमसने 450 वर्षांपूर्वी भारतीय निवडणुकांची भविष्यवाणी कशी केली, हे सांगणे कठीण आहे. पण 2014 मध्ये कोणता पक्ष सत्तेत येणार आणि कोणाच्या राजकारणाचा अंत होईल, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.
फ्रेंकोइस गॉटियरच्या ब्लॉगमधील नास्त्रेदमसच्या भाकितांबाबत...

"Politicus Bharatus Janatus Indicus veni grandus est vingtus unus centurus
– Congressus oublium est …”
म्हणजे
21 व्या शतकात भारतात भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल. तर काँग्रेसचे पतन होईल.

“Politicus Bharatus Janatus Indicus veni grandus est para Indus cognisant
Indica tum est… ”
म्हणजे
हिंदुत्त्ववादी विचारप्रणाली असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशांच्या बहुतांश भागांत सत्ता स्थापन करेल.

दुस-या एका भविष्यवाणीनुसार, “Politicus Bharatus Janatus Indicus tri pillarus est,
Vajpayum, Advanum persistum est et Narendrum Modum. Vajpayum
emergum est…”
म्हणजे,
भाजपचे तीन मुख्य स्तंभ आहेत : अटल बिहारी वाजपेयी, एलके आडवाणी आणि नरेंद्र मोदी. शेवटी वाजपेयी राजकारणात सक्रिय नसतील, आडवाणी कायम राहतील तर नरेंद्र मोदी वेगाने समोर येतील.
हे सर्व नास्त्रेदमसनेच लिहून ठेवले याला काहीही आधार नाही. मात्र, फ्रँकोइस गॉटियरच्या ब्लॉगबरोबरच eternalcadence.wordpress.com वरी याबाबत उल्लेख आढळतो.
पुढील स्लाईड्सवर वाचा नास्त्रेदमसच्या ख-या ठरलेल्या काही भविष्यवाणी