आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Keeping Mother With Him Railway Suspended Its Staff Member

आईचा सांभाळ न करणारा रेल्वेचा कर्मचारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - आई व पत्नीचा सांभाळ न करणा-या कर्मचा-याला रेल्वे खात्याने निलंबित केले आहे. कौटुंबिक जबाबदारी पार न पाडल्यावरून रेल्वे सर्व्हंट रूलनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यास बडतर्फही केले जाऊ शकते.
वडिलांचा 2004 मध्ये मृत्यू झाल्यानंतर बलोतर येथील स्वरूपरामला रेल्वेने बुकिंग क्लार्क म्हणून नोकरीवर घेतले होते. 2008 मध्ये लग्न झाल्यापासून मुलगा परक्यासारखी वागणूक देत असल्याची तक्रार त्याची आई जतनादेवी यांनी रेल्वेकडे केली होती. पत्नीचाही तो शारीरिक व मानसिक छळ करतो. रेल्वेतील एका महिला कर्मचा-याशी त्याचे संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. स्वरूपरामवरील आरोपांची चौकशी सुरू आहे. आरोप सिद्ध झाल्यास त्याला बडतर्फही केले जाऊ शकते. दरम्यान, स्वरूपरामने मात्र आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करत निलंबनाच्या कारवाईला आव्हान दिले आहे.