Home »National »Other State» Not Only Aarushi Thease Are Top 10 High Profile Murder Cases In India

फक्त आरुषीच नाही, या आहेत देशाला हादरवून टाकणाऱ्या 10 हायप्रोफाइल मर्डर केस

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:55 PM IST

नोएडा - अलाहाबाद हायकोर्टाने 9 वर्षे जुन्या नोएडाच्या आरुषी- हेमराज मर्डर केसमध्ये तलवार दांपत्याला निर्दोष मुक्त केले आहे. याप्रकरणी सीबीआयच्या कोर्टाने आरुषीच्या आईवडिलांना - राजेश आणि नूपुर तलवार यांना 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांनी याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. फक्त आरुषीच नाही, मुंबईचे शीना बोरा हत्याकांड, दिल्लीचे नितीश कटारा केससहित देशातील अनेक अशा चर्चित मर्डर केस झाले, ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. अशाच काही मर्डर केसचा हा आढावा.
आरुषि- हेमराज मर्डर केस...
- 16 मे 2008 रोजी दिल्लीच्या लगत असलेल्या नोएडाच्या जलवायू विहार येथील घरात 14 वर्षीय आरुषीचा खून करण्यात आला होता. आरुषीचा खून गळा चिरून करण्यात आला. तब्बल साडेपाच वर्षे सुरू असलेल्या तपास आणि सुनावणीनंतर सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने तिचे आईवडील नूपुर आणि राजेश तलवार यांना दोषी ठरवले होते. नूपुर आणि राजेश तलवार गाझियाबादच्या डासना जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
- हे प्रकरण दीर्घकाळ माध्यमांत राहिले. आरुषीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मायावती यांनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
- आरुषीसोबतच घरातील नोकर हेमराजचाही खून झाला होता. हेमराज (45) चा मृतदेह आरुषीच्या खुनानंतर एका दिवसाने तलवार दांपत्याच्या छतावर एका कुलरमध्ये आढळला होता.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी काही चर्चित मर्डर केसबाबत...

Next Article

Recommended