आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराविरोधात अनोखी मोहीम, लाचखोरांच्या उरात धडकी भरवणारी नोट !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - रोहन प्रसाद तंजावरच्या वीज कार्यालयात कनेक्शन घेण्यासाठी. तेथे बसलेला अधिकारी त्यांना १२ हजार रुपये लाच मागतो. रोहन त्वरित खिशातून शून्य रुपयाची नोट काढून अधिकाऱ्याला देतात. नोट पाहून अधिकारी आधी तर खिल्ली उडवतात, नंतर कार्यालयातील लोकांना बोलावून नोटा फाडतात. रोहन चुपचाप तेथून बाहेर जातात आणि थेट ‘शून्य रुपये नोट’टीमकडे जातात. रोहनचे म्हणणे ऐकल्यानंतर टीम त्यांना दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक निरीक्षकाकडे घेऊन जाते. दुसऱ्या दिवशी रोहन पुन्हा त्याच कार्यालयात जातात. अधिकारी पुन्हा लाच मागतो. या वेळी निरीक्षक त्याला पुराव्यासह अटक करतात. आठवडाभरात रोहनला कनेक्शन मिळते. तेही लाच दिल्याशिवाय.

ही शून्य रुपयाची नोट काय आहे याचा विचार तुम्ही करत असाल. ही लाचखोरीविरोधातील लढाईची नवी पद्धत आहे. ‘फिफ्थ पिलर’नावाची संस्था शून्य रुपयाची नोट बनवते आणि ती लाच मागणाऱ्यांना देते. आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त नोटा वाटण्यात आल्या आहेत. नऊ वर्षांत ही मोहीम देशभरात भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईतील अनोखे शस्त्र ठरली आहे. मोहिमेच्या समन्वयक लक्ष्मी गुणासेकर यांनी सांगितले,‘सुरुवातीला आमची खूप खिल्ली उडवली जात असे. सर्व जण आम्हाला हसत. पण आम्ही ठाम राहिलो. मोहीम सोडली नाही. लाच देणार नाही, असा ठाम निर्धार केला की ही नोट काम करते. विजय आनंद यांनी ही कल्पना भारतात आणली आहे. ते कोलंबिया विद्यापीठात असताना डॉ. बागथ तेथे शून्य नोट वाटत होते. विजयला ही कल्पना आवडली. आज तामिळनाडूच्या १२ जिल्ह्यांत फिफ्थ पिलरची केंद्रे आहेत. मुख्यालय चेन्नईत तर बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि राजस्थानच्या पाली येथे शाखा आहेत. संस्था अनेक स्तरांवर काम करत आहे. कोणाचा कॉल आला की टीम त्यांना सरकारी विभागात कोण मदत करू शकते याची माहिती देते. त्याशिवाय लाच दिल्याशिवाय कसे काम करता येते हेही शिकवले जाते. त्यांना अधिकाऱ्याचे नाव/पद विचारणे आणि शुल्काची पावती घेणे अशा गोष्टीही सांगितल्या जातात. आवश्यकता भासल्यास टीममधील लोक स्वत: सरकारी कार्यालयाशी संपर्क करतात. त्यांचा दक्षता आणि सीबीआयशी संपर्क घडवतात. अनेकदा आरटीआयच्या वापरातही मदत करतात. कोणाची इच्छा असेल तर संस्थेच्या वेबसाइटवरून शून्य रुपयाची नोट डाऊनलोड करून प्रिंटही करू शकतात. या नोटा हिंदीव्यतिरिक्त तमीळ, मल्याळम, कानडी आणि तेलुगूतही तयार आहेत. संस्था दोन विशेष कार्यक्रमही करते. शाळांसाठी स्कूल ऑफ डेमॉक्रसी आणि महाविद्यालयांसाठी फ्रीडम फ्रॉम करप्शन.’ फिफ्थ पिलरने आतापर्यंत तीन हजारपेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यात रिश्वत देणाऱ्या आणि घेणाऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात नव्या कल्पना शिकवल्या जातात. आतापर्यंत हजारो लोकांनी लाच मागितल्यावर या शून्य रुपयाच्या नोटा दिल्या आहेत.
नोटेची ४ वैशिष्ट्ये : पहिले : नोटेच्या मूल्याच्या जागी ‘0’ लिहिले आहे. दुसरे : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जागी ‘भ्रष्टाचार संपवा’ असे आहे. तिसरे : दोन संदेश-‘घेणार नाही, देणार नाहीची शपथ घेतो.’ आणि ‘लाच मागितली तर ही नोट द्या आणि आम्हाला कळवा.’ चौथे : संस्थेचा फोन नंबर आणि ई-मेल आयडी नोटेवर आहे.
बातम्या आणखी आहेत...