आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश हत्याकांडाशी संघाचे नाव जोडल्याने भाजपची गुहा यांना नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव जोडल्यामुळे भाजपने इतिहासकार रामचंद्र गुहा यांना कायदेशीवर नोटीस बजावली. गुहा यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे नोटीसीत म्हटले आहे.  

गुहा यांनी एका संकेतस्थळावरून  हे वक्तव्य केले होते की, ‘ज्या संघ परिवाराशी निगडित मारेकऱ्यांनी दाभोलकर, पानसरे व कलबुर्गींची हत्या केली तेच गौरी लंकेश यांचे मारेकरी असण्याची शक्यता आहे.’  दरम्यान, गुहा यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, एखादे पुस्तक किंवा लेखाचे उत्तर दुसरे पुस्तक किंवा लेखच असू शकते. पण सध्या आपण वाजपेयींच्या भारतात राहत नाहीत.’ दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘सध्याच्या भारतात स्वतंत्र लेखक आणि पत्रकारांचे शोषण केले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय, इतकेच नव्हे तर त्यांची हत्याही केली जात आहे. पण आपण गप्प बसू नये.’
बातम्या आणखी आहेत...