आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत खाते उघडण्यासाठी आता रेशन कार्ड नव्हे तर आधार कार्ड धरणार ग्राह्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता आधार कार्डाचा पुरावा ग्राह्य धरून नवीन खाती उघडण्याचे निर्देश 17 जुलै रोजी सर्व बँकांना दिले आहेत. यापूर्वी लोकांना पुरावा म्हणून रेशन कार्ड द्यावे लागत होते. पण आता आधार हाच खाते सुरू करण्यासाठी एकमात्र पुरावा ठरवण्यात आला आहे.
यापूर्वी आरबीआयने कोणत्याही व्यक्तीचे खाते सुरू करण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स. पासपोर्ट आणि नरेगा कार्डचा वापर करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले होते. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केवळ केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या कागदपत्राचाच नवे खाते सुरू करण्यासाठी वापर करण्यात येतो.
आधार कार्ड सर्वात चांगले
आरबीआयने आयआयटी मुंबईचे प्राध्यपक आशीष दास यांच्या अहवालाचा आधार घेऊन हा बदल केला आहे. त्यांच्या अहवालानुसार आधार कार्ड हे बँकेत खाते सुरू करण्यासाठी सर्वात सुरक्षित असा पुरावा ठरू शकतो. दास यांच्या मते पॅन कार्डचा वापर करासंबंधी, ड्रायव्हींग लायसन्सचा वापर वाहन चालवताना, रेशन कार्डचा वापर अन्न धान्य मिळण्यासाठी, आणि पासपोर्टचा वापर विदेशात जाण्यासाठी होतो. उरले ते आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र त्यापैकी मतदान ओळखपत्र वयाच्या 18 व्या वर्षानंतरच मिळते. पण बँकांमध्ये त्यापेक्षा कमीय वयाच्या खातेदारांची खातीही उघडता येतात. त्यामुळेच आधार कार्ड हे खाते उघडण्यासाठी सर्वात चांगला पुरावा आहे.
बँकांवर परिणाम नाही
यामुळे बँकेच्या व्यवसायावर फारसा प्रभाव पडणार नाही. त्याचे कारण म्हणजे बँकेत छोटी खाती विना कागदपत्रांचीही सुरू करते. त्याची मर्यादा 50000 ते 100000 एवढी असते. खाते सुरू झाल्यानंतर ग्राहकाला कागदपत्रे जमवण्यासाठी एका वर्षाचा वेळ दिला जातो. त्यामुळे सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि बँकाच्या कर्मचा-यांना आपल्या ओळखपत्रावर खाते उघडता येते.
फाइल फोटो : आधार कार्ड मिळवलेल्या महिला