भागलपूर | ५९ व्या आवृत्तीच्या स्वरूपात गुरुवारी दैनिक भास्करच्या भागलपूर आवृत्तीचे लोकार्पण झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, खासदार अश्विनी चौबे, महापौर दीपक भुवानिया व ‘भास्कर’चे जगदीश शर्मा, ओम गौड आणि सौरेंद्र चॅटर्जी उपस्थित होते. दैनिक भास्करच्या संपूर्ण बिहार विस्ताराच्या शृंखलेत बिहारमधील ही दुसरी आवृत्ती आहे. यानंतर गया व मुजफ्फरपूर अावृत्त्यांचे प्रकाशन होईल.