आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Ebola In India ! One Suspected Found In Bihar, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात पोहोचला जीवघेणा इबोला व्हायरस? बिहारमध्ये आढळला संशयित रुग्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- आफ्रिकन देशांमधून संपूर्ण जगात पसरलेला जीवघेणा इबोला व्हायरस आता भारतात पोहोचला आहे. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात 'इबोला'चा संशयित रुग्ण आढळला आहे.
आफ्रिकेतील लाइबेरियाहून गेल्या 27 ऑगस्टला मायदेशी परतलेले वीरेंद्र सिंह यांना 'इबोला व्हायरस'ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वीरेंद्र सिंह यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असता त्यात इबोलाची लक्षणे आढळल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

वीरेंद्र सिंह हे गोपालगंजमधील लोमी चोर गावातील रहिवासी आहेत. सिंह यांच्यात इबोलाची लक्षणे आढळून आल्याच्या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिंह यांचा वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात बोलावून घेतले आहे.

सिंह हे 7 फेब्रुवारी 2014 रोजी लाइबेरिया येथे नोकरीसाठी गेले होते. लाइबेरियामध्ये 'इबोला'ची साथ पसल्याने जवळपास 625 भारतीय नागरीक 27 ऑगस्टला भारतात परतले होते. यात सिंह यांचा समावेश आहे. लाइबेरियातून भारतात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय पथक तपासणी करत आहे. त्यात सिंह यांना इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांन‍ी सांगितले.
दरम्यान, इबोला व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी भारतात चेन्नई आणि मुंबईत इबोलाचे संशयित रुग्ण आढळले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय आहे इबोला आणि कुठे आढळला हा जीवघेणा व्हायरस...

(फाइल फोटो: इबोला व्हायरस)