आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now I Am Old , But My Fiance Please Travel Me Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साठी उलटली धनी, आता तरी जिवाची मुंबई घडवा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार - 30 वर्षांपूर्वी माझ्या नवर्‍याने मला वचन दिले होते की, तुला मुंबई फिरवून आणेन. वर्षावर वर्षे उलटली. ते मला नेहमी आज जाऊ, उद्या जाऊ असे म्हणून टाळत राहिले. गेल्या 30 वर्षांपासून मी नवर्‍यासोबत ‘जिवाची मुंबई’ करण्याची वाट बघत आहे, परंतु आता ते त्यांच्या वचनापासून पाठ फिरवत आहेत, अशी तक्रार एका 60 वर्षीय महिलेने कौटुंबिक केंद्राच्या अधिकार्‍याकडे केली. तिची ही आगळीवेगळी तक्रार ऐकून अधिकारीदेखील हैराण झाले.

हरियाणातील एका महिलाने तक्रारीत म्हटले की, माझे पती तहसीलदार होते. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांनी मला मुंबईला फिरायला घेऊन जाण्याचे वचन मला त्यांनी 30 वर्षांपूर्वी दिले होते, परंतु आता निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांचा शब्द पाळत नाहीत. आता माझा संयम संपल्याने मी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत आहे. कौटुंबिक सल्ला केंद्राच्या अधिकार्‍यांनी सदर महिलेच्या पतींना बोलावून घेऊन त्यांची समजूत घातली. त्यांनी सर्वांसमक्ष पत्नीला लवकरच मुंबईला फिरायला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले.


कौन्सिलिंगमध्ये पत्नी म्हणाली : कौन्सिलिंगदरम्यान महिलेने सांगितले, ‘30 वर्षांपूर्वी मला माझ्या पतीने आश्वासन दिले होते की, ते मला मुंबईला फिरायला घेऊन जातील. दरवर्षी मी त्यांच्याकडे फिरायला जाण्याचा विषय काढत असे, परंतु त्यांनी ते टाळले. निवृत्त झाल्यावर तरी ते शब्द पाळतील, असे वाटत होते. पण दोन वष्रे झाली. परंतु मुंबईचा विषय काढला की ते मला भांडायला लागतात. आता माझा संयम संपला आहे.’ त्यानंतर अधिकार्‍यांनी पतीची समजूत घालून त्यांना मुंबईसाठी राजी केले. पत्नीनेही त्यांना तंग करणार नाही, असे आश्वासन दिले.


अशी होती पत्नीची तक्रार
*म्हणाले होते रिटायर झाल्यावर मुंबई दाखवून आणतो.
*आता मुंबईचे नाव काढले तरी भांडतात.
*बरीच मनधरणी केल्यानंतर पतीमहाशयांची पत्नीला मुंबई दाखवण्याची तयारी