आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Love Jihad In Bihar, Girl Kidnapped And Forced To Change Her Religion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'लव्ह जिहाद\'@बिहार: विद्यार्थिनीचे अपहरण,धर्म परिवर्तन करून बळजबरीने केला निकाह!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागलपूर- उत्तर प्रदेशानंतर आता बिहारमधील भागलपूर येथेही 'लव्ह जिहाद' प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपींनी चौदा वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला बळजबरीने धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर तिच्याशी निकाह (विवाह) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडितेने विरोध केल्यास तिला वेश्यावस्तीत विकण्याची तसेच त‍िच्या कुटुंबियांची हत्या करण्याची धमकीही देण्यात आली.

पी‍डिता भागलपूर येथील मिरजनानहाट भागातील रहिवासी आहे. तिचे गेल्या 30 एप्रिलला अपहरण झाले होते. पीडितेला कुराण वाचण्यास दिले. एवढेच नव्हे तर हिंदू धर्मात वर्जित असलेले पदार्थही तिला खाण्‍यास दिले. तिने विरोध केला असता तिला जबर मारहानही केली.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि त्याच्या आई-वडिलांनी काझीच्या मदतीने तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले. तसेच आरोपी तरुणासोबत तिचा बळजबरीने निकाहही लावण्यात आला. एवढेच नव्हे तर अनेक दस्ताऐवजवर तिच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. तिचे नाव बदलण्यात आले. कुराण वाचण्यास दिले. तसेच हिंदू धर्मात वर्जित असलेले पदार्थ तिला खाण्यास दिले. तिने विरोध केल्यास जबरदस्तीने तिच्या तोंडात ते अक्षरश: कोंबण्यात आले.

पी‍डिता सीबीएसआय बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर आजीच्या गावी धुआवे येथे गेली होती. तेथून तिचे अपहरण करण्‍यात आले. आरोपींनी तिला वेश्यावस्तीत विक्री करण्‍याची धमकी दिल्याने सुरुवातीला पीडित विद्यार्थिनीने अपहरण झाले नसल्याचे कोर्टात सांगितले होते. परंतु, आता स्वत: पीडितेने पोलिस ठाण्यात अर्ज करून आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिसांत आरोपी तरुणासह त्यांच्या आई-वडील आणि अन्य पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी तरुण अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहात ठेवले आहे. आरोपीचे वडील रोहतास जिल्ह्यात आरोग्य विभागात कार्यरत आहे. भागलपूर शहरातील नाथनगरातील शाहजंगी भागातील ते रहिवासी आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आरोपींच्या कैदेतून स्वत:ची सुटका करून पीडिता पोहोचली सरपंचांच्या घरी...

(फोटो: पीडित विद्यार्थिनी)