आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Love Lesson Learn In Class, Kolkata\'s Presidency University Inititive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमाचे धडे गिरवायला मिळणार वर्गात, कोलकत्यातील प्रेसिडेन्सीचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - प्रेमाची महती अनादि आहे. परंतु प्रेमाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून त्याचे धडे गिरवण्याची वेळ आली असावी. त्यामुळेच कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी विद्यापीठाने याला विषय म्हणून अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.


विद्यापीठाला 200 वर्षांचा इतिहास आहे. विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाने प्रेम विषयाची रचना केली आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थी या विषयाचा अभ्यास करू शकतात. प्रेमाचे सामाजिक पैलू दर्शवणाºया घटकांचा विचार करून आम्ही अभ्यासक्रम तयार केला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू मालबिका सरकार यांनी दिली. प्रेमाला विविध कलांतून मांडण्याची अनेक शतकांची परंपरा पाहायला मिळते. साहित्य, चित्रकलेसह इत्यादी अनेक माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. विद्यार्थ्यांना प्रेमातील संवादाचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी भक्ती कालखंडाचा अभ्यास यातून करता येणार आहे. तर्कवाद आणि भावना यांच्यातील संघर्ष पूर्वापार सुरू आहे. प्रणय आणि शृंगार इत्यादी विषयदेखील विद्यार्थ्यांना जाणून घेता येणार आहेत. महान दिग्दर्शक सत्यजित रे, नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहंमद अली बोगरा, बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अबू सईद चौधरी यांच्याशिवाय स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस असे महान व्यक्ती या विद्यापीठाचे विद्यार्थी होते.


50 गुणांसाठी : प्रेमात सर्व काही माफ असते. ते लक्षात घेऊनच विद्यापीठाने बहुधा त्याला अनिवार्य केले नाही. ऐच्छिक स्वरूपात त्याची निवड करता येऊ शकते. कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा विषय निवडू शकतो. तो पन्नास गुणांचा असेल.


विद्यापीठाचा इतिहास काय ?
प्रेसिडेन्सी विद्यापीठाचे मूळ नाव हिंदू कॉलेज असे आहे. थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी 1817 मध्ये त्याची स्थापना केली होती. 2010 मध्ये त्याचे नामांतर करून प्रेसिडेन्सी असे करण्यात आले.
प्रेम म्हटल्यानंतर भारतात तरी बॉलीवूडला वगळून चालणार नाही. याची अभ्यासक्रम मंडळाला पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्यांनी अभ्यासक्रमात बॉलीवूडमधील व्यक्तींवर आधारित एक धडा ठेवला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील निर्माते राज कपूर, गुरुदत्त, यश चोप्रा यांच्या चित्रपटांनाही त्यात स्थान मिळाले आहे.