आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा केद्रीय मंत्री रामविलास पासवान अधिकाऱ्यावर भडकले, भेटले पूरग्रस्तांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाली (बिहार) - बिहारमध्ये अजून पूर ओसरलेला नाही. अशातच राजकीय नेत्यांचे पाहाणी दौरे वाढले आहेत. गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी निघाले. मात्र अर्ध्यारस्त्यातच असे काही झाले की पासवान अधिकाऱ्यांवर भडकले. पासवान यांना एवढे चिडलेले क्वचितच कोणी पाहिले असेल.

झाले असे की पासवान बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा मतदारसंघ राघोपूर येथील पूरग्रस्तांच्या भेटीसाठी नावेतून निघाले होते. मात्र पासवान यांच्यासोबत असलेले हाजीपूरचे एसडीओ रविंद्रकुमार पुढे खूप धोका आहे. पाणी जास्त आहे असे सांगून त्यांना पुढे जाण्यापासून थांबवत होते. यावरुनच पासवान भडकले.

संथ गतीने चालली होती नाव
- पासवान यांना लवकरात लवकर पूरग्रस्तांच्या भेटीसाठी जाण्याची इच्छा होती. मात्र नाव हळुहळु चालली होती.
- अशातच एसडीओ रविंद्र कुमार त्यांना परत-परत पुढे जायला नको असे सांगून त्यांच्या दौऱ्यात आडकाठी आणत होते. यामुळे पासवान आणखी चिडले, आणि अधिकाऱ्याला फैलावर घेतले.
- एनडीआरएफ टीमसोबत गळ्यात लाइफ जॅकेट घालून पासवान पूरग्रस्तांना भेटले आणि कोणत्या परिस्थितीत ते राहात आहेत, याची विचारपूस केली.
बातम्या आणखी आहेत...