आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आता शरद यादव निर्णय घेतील; बिहारमध्ये जदयूच्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपसोबत जाण्यास विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बंडखोरीच्या तयारीत असलेले जनता दल (संयुक्त)चे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्याशी समझोता करण्याचे सर्व मार्ग बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बंद करून टाकले. यादव यांनी भाजपसोबतची युती एकतर मान्य करावी, अन्यथा आपला मार्ग 
निवडावा, असे शुक्रवारी त्यांनी स्पष्ट केले. शरद यादव यांनी भाजपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला आहे.   

नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शरद यादव स्वतंत्र निर्णय घेण्यास मोकळे आहेत. पक्षाकडून आधीच निर्णय घेण्यात आलेला आहे. भाजपसोबत युती करण्याचा निर्णय मी एकट्याने घेतलेला नव्हता. त्यांचा निर्णय वेगळा असेल तर त्यांना पटेल तो निर्णय घेण्यास ते मोकळे आहेत. बिहारमध्ये आघाडी बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर नितीशकुमार प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी एक दिवस आधी शरद यादव यांनी आपण आजही महाआघाडीसोबत आहोत. महाआघाडीला जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिले होते, असे यादव यांनी सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...