आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Sunita Tomar's Son Enters In Anti tobacco Campaign

तंबाखूने माझ्यापासून आई हिरावली, तुम्ही खाऊ नका... मुलाचा अभियानात सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंड - तंबाखूच्या वाटेला जाऊ नका, त्याचे सेवन करू नका. तंबाखूने माझ्या आईचा बळी घेतला, तिला माझ्यापासून हिरावले. आता त्यामुळे माझ्या कुण्या मित्राचा बळी जावा, असे मला वाटत नाही. माझी आई माझ्यापासून दूर गेली, तसे तुमच्या कुटुंबाने तुला गमवून बसावे, असेही मला वाटत नाही. फेकून दे ती तंबाखू, खाऊ नकोस...

ही कुठल्या तंबाखूविरोधी अभियानाची जाहिरात नाही हे लक्षात घ्या. तर ती एका १३ वर्षीय कुलदीप ऊर्फ ध्रुव तोमरची कळकळीची विनंती आहे. आपल्या आजूबाजूला प्रत्येक छोटी-मोठी व्यक्ती अथवा तंबाखू खाणाऱ्या दिसेल त्या प्रत्येक व्यक्तीला तो हेच सांगत राहतो. लोकदेखील त्याचे बोलणे गांभीर्याने ऐकतात. कारण त्याने त्याची आई यात गमावली आहे. त्याची आई सुनीता तोमर यांचा तंबाखूमुळे मुख कर्करोग झाल्याने १ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. तंबाखूविरोधी मोहिमेचा चिरपरिचित चेहरा म्हणून सुनीता तोमर यांना ओळखले जाते. भिंड येथे राहणाऱ्या ध्रुवचे शाळेतील नाव कुलदीप तोमर आहे. कॉटनजीन भागातील उत्कृष्ट शाळेत तो आठवीत शिकतो.

विचारल्यावर तो सांगतो, "आई तर जगातून निघून गेली, पण तिची शिकवण आजही माझ्या स्मरणात आहे व कायम राहील. आईला जेव्हा तोंडाच्या कॅन्सरविषयी कळले तेव्हा ती मला व माझा छोटा भाऊ गंधर्वला सतत सांगत असे की बेटा, कधीही तंबाखू खाऊ नका.'
आता हीच गोष्ट मी इतरांना सांगत आहे. इतके सांगितल्यावर ध्रुवचे डोळे पाणावतात. आईला जाऊन फक्त १३ दिवसच झाले आहेत. ध्रुवचे वडील बृजेंद्र सांगतात की, "तो कुणालाच तंबाखू खाताना पाहू शकत नाही. दु:खी होतो. त्याने मलाही सांगून टाकले की, जे लोक तंबाखू खातात त्यांना घरी येऊ देऊ नका. माझे काही मित्र तंबाखू खात होते. ध्रुवने त्यांनाही घरी येण्यापासून रोखले.'

आईला मैत्रिणींमुळे लागली होती सवय
ध्रुवच्या माहितीनुसार त्याच्या आजोळी कुणी तंबाखू खात नव्हते, परंतु आईला तिच्या मैत्रिणींमुळे तंबाखूची सवय लागली होती. मी आता शाळेत सोबत शिकणारी मुले, स्टाफ मेंबर किंवा अन्य कुणाला मिठी सुपारी खाताना बघितले तरी मला भीती वाटते. ती त्याला टाकायलाच भाग पाडतो. प्रसंगी वरिष्ठांकडे तक्रारही करतो. शाळेचे प्राचार्य नरेश सिंह म्हणाले की, ध्रुवच्या बोलण्याचे कुणाला वाईट वाटत नाही. कारण त्यात त्याचा स्वार्थ नाही. त्यामुळे त्याला सगळे सहकार्यच करतात.