आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now The Children Above 10 Years Will Be Allowed To Open And Operate Savings Bank Account

पिग्गी बँक विसरा, आता 10 वर्षाच्या बालकांनाही करता येणार थेट बँक व्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणा-यांना (मायनर) बँकेचे बचत खाते सुरू करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कोणत्याही गार्डीयन म्हणजेच पालकाच्या गॅरंटीशिवाय बँकांना १० वर्षांपेक्षा अधिक वय असणा-या मुलांची बँक खाती उघडता येणार असल्याचे मंगळवारी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. विशेष म्हणजे या मुलांनाच या खात्याचे व्यवहार करण्याची परवानगीही दिली आहे.
सध्या बँकेतर्फे मुलांना (मायनर) केवळ आई-वडील अथवा इतर कोणीतरी गार्डीयन असेल, तरच बचत खात्याचे व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. पण आता रिझर्व्ह बँकेने मुलांना ही परवानगी दिली आहे. त्याचबरोबर आता या मुलांना इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड आणि चेकबूकसारख्या सुविधा देण्याची परवानगीही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिली आहे. सध्याच्या नियमानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वय असणा-या सर्वांना मायनर मानले जाते.
मात्र, त्याचवेळी खात्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मुलांना ओव्हरड्राफ्टसारख्या सुविधा दिल्या जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच या मायनर अकाऊंटमध्ये नेहमी पॉझीटीव्ह बँलेंस असणे गरजेचे असणार आहे.
१९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मायनर खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक दाखवावी लागणार आहे. जर खाते आई-वडील किंवा एखाद्या गार्डीयनद्वारे वापरले जात असेल, तर बँकांना मायनर खातेधारकाची स्वाक्षरी घेऊन त्यांच्याकडे रेकॉर्डमध्ये ठेवावी लागेल.