आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदारांच्या नऊ म्हशी मागे चक्क युपी पोलिस, चोरांच्या शोधासाठी नाकाबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्सेट मध्ये- भाजपचे आमदार धर्मपाल सिंह - Divya Marathi
इन्सेट मध्ये- भाजपचे आमदार धर्मपाल सिंह
बरेली- उत्तर प्रदेश पोलिस पुन्हा एकदा म्हशींचा शोध घेण्यात व्यग्र दिसत आहेत. यावेळी आवला येथील भाजपचे आमदार धर्मपाल सिंह यांच्या म्हशी चोरट्यांनी पळवल्या आहेत. सोमवारी (22 जून) मध्यरात्री फार्महाऊनवर बांधलेल्या नऊ म्हशी घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

बरेली पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रात्रीचा दिवस केला. परंतु पोलिस रिकाम्या हातांनी परतले आहेत. त्यामुळे आता आमदार धर्मपाल सिंह यांच्या म्हशींचा शोध घेण्यासाठी तीन-चार पोलिस पथके चारही दिशांना पाठवण्यात आले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, भाजपचे आमदार धर्मपाल सिंह यांच्या फार्महाऊसमध्ये सोमवारी (23 जून) रात्री उशीरा काही चोरट्यांनी प्रवेश केला. सालदाराला चाकूचा धाक दाखवून नऊ म्हशी पळवून नेल्या. चोरांनी पोबारा केल्यानंतर सालदाराने घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी नाका बंदी केली. बरेलीसह आजुबाजूच्या जिल्ह्यात वायरलेसने म्हशींच्या चोरीची माहिती दिली आहे. म्हशींचा शोध घेण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. सराईत गुन्हेगारांचीही चौकशी केली जात आहे. तरी देखील अद्याप ठोस माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

दरम्यान, जवळपास दीड वर्षापूर्वी उत्तर प्रदेशीचे मंत्री आझम खान यांच्या म्हशी चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी अवघ्या 36 तासांत त्यांच्या शोध घेतला होता. 31 जानेवार 2014 ला रामपूर येथील डेअरी फार्ममधून आझम खान यांच्या मालकीच्या सात म्हशी चोरीस गेल्या होत्या. म्हशींच्या शोधात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून काही पोलिस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्‍यात आली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आझम खान यांच्या म्हशी चोरांना अटक केल्याचा पोलिसांचा दावा....