आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर शुगरच्या 10 रुपयांत 5 चाचण्या, बंगळुरूच्या कंपनीने बनवले "आइना' उपकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मधुमेहींसाठी एक खुशखबर आहे. बाजारात लवकरच एक असे उपकरण येणार आहे जे ग्लुकोजसोबतच एचीबीए१सी, लिपिड्स, क्रिटीनाइन आणि हिमोग्लोबीन चाचणीचा रिपोर्ट थेट आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर देईल. हा रिपोर्ट आपण डॉक्टराला ई-मेलद्वारे पाठवू शकाल किंवा मोबाइलवरूनच दाखवून औषधी व आहारासंबंधी त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकाल.
विशेष म्हणजे, प्रयोगशाळेतील चाचण्यांप्रमाणे आता नळकांडी भरून रक्त देण्याची गरज नसेल. ग्लुकोमीटरप्रमाणेच रक्ताच्या एका थेंबाद्वारे पाच चाचण्या शक्य होतील. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बायोटेक्नालॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काैन्सिलच्या मदतीने बंगळुरूच्या एका कंपनीने "आइना' नामक उपकरण बनवले आहे. हे उपकरण आकाराने ग्लुकोमीटरपेक्षाही लहान असून हेडफोनप्रमाणेच अँड्राॅइड फोनशी जोडता येते.

बायोटेक्नालॉजी विभागाचे सचिव डॉ. विजय राघवन यांच्या मते, एम्स आणि नारायण हृदयालयाने उपकरणाच्या चाचणी निकालास दुजोरा दिला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ग्लुकोमीटरवर ग्लुकोजच्या रीडिंगसाठी स्ट्रीपमागे १८ ते २५ रुपये खर्च करावे लागते. मात्र, आइना उपकरणात स्ट्रीपमागे १० रुपयांपेक्षाही कमी खर्च येईल. प्रयोगशाळेत फक्त ग्लूकोजची फास्टिंग व पीपीच्या तपासणीसाठी सुमारे १५० रुपये खर्च येतो.

मधुमेहींना वर्षातून किमान दोन वेळा तरी एचबीए१सी चाचणी करावी लागते. या चाचणीसाठी सुमारे २०० रुपये खर्च येतो. ही चाचणी लिपिड्सचे (कोलेस्टेराॅल अर्थात एचडीएल, एलडीएल आणि ट्रायग्लीसराइड्स) प्रमाण जाणून घेण्यासाठी केली जाते.
मधुमेहींची लक्षणे आणि कारणे
- जीवनशैली किंवा आनुवांशिक आजाराने जडते.
- स्वादुपिंड ग्रंथी इन्सुलिनची निर्मिती बंद करतात यामुळे मधुमेहाचा अाजार अाणखी वाढत जाताे.
- या अाजारात वजन घटते अाणि भूक वाढते.
- थकवा येताे, वारंवार लघवीला जावे लागते.
- भरपूर तहान लागते, नजर कमी हाेतेे.
बातम्या आणखी आहेत...