आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयलरचा एवढा भीषण स्फोट की 10 फुटांवर लटकले होते मृतदेह- दुर्घटनेचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - येथे बुधवारी दुपारी उंचाहार येथील एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर प्लँट) मध्ये बॉयलरचे स्वयंचलित गेट कोणतीही सूचना न देता उघडण्यात आले होते, यामुळे भीषण स्फोट होऊन मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. तर तब्बल 100 जण जखमी आहेत. याठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमींशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला. एकाने सांगितले की, तो आग आणि धुराच्या लोटांमध्ये अडकला होता, परंतु पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारत त्याने स्वतःचे प्राण वाचवले.
 
एनटीपीसीमध्ये 1500 हून अधिक जण काम करतात....
- ऊँचाहारमध्ये एनटीपीसीच्या 5व्या युनिटमध्ये बॉयलरचा विस्फोट झाला. येथे 1500 हून जास्त जण काम करतात. अपघातानंतर एनटीपीसी परिसरात बाहेरच्या लोकांना प्रवेशाला मनाई करण्यात आली. CRPFच्या अनेक तुकड्या तेथे तैनात करण्यात आल्या.
 
NDRFची टीम पोहोचली. 
- एनटीपीसी प्लँटमध्ये NDRFच्या 32 मेंबर्सची टीम पोहोचली आहे. रेस्क्यू आणि रिलीफ ऑपरेशन सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या 20 जणांना लखनऊला रेफर करण्यात आले आहे.
 
NTPCने काय म्हटले?
- NTPC ने म्हटले, उंचाहारच्या 500 मेगावॉटच्या अंडरट्रायल युनिटमध्ये अपघात झाला. रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. डिस्ट्रिक्ट अॅडमिनिस्ट्रेशन घटनास्थळी उपस्थित आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भीषण स्फोटोचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...