आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीपीसी बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा 26 वर; मदत निधी जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली (उ.प्र.)- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये  (एनटीपीसी) झालेल्या बॉयलर स्फोटातील मृतांचा आकडा २६ वर गेला आहे. अद्याप ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील उंचाहार येथे हा प्रकल्प आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी उंचाहारला भेट दिली. राहुल  गांधी यांनी आपल्या गुजरात निवडणूक दौऱ्यातून वेळ काढत येथील जिल्हा रुग्णालयात जखमींना भेट दिली. या वेळी राहुल यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसचे राज्य अध्यक्ष राज बब्बर होते.  

हे बॉयलर वेळापत्रकात निश्चित वेळेपूर्वी चालवले जात होते असे या भेटीतून आपल्याला कळले. असा धोका पत्करणे चुकीचे होते. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांच्या भेटीवेळी आर.के. सिंह हेदेखील एनटीपीसी प्लँटवर होते. त्यांनी सांगितले की, हे बॉयलर घाईत चालवले जात नव्हते. याचे काम मार्चमध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर २ ते ३ महिने याची चाचणी झाली होती. या घटनेत मृत व्यक्तींच्या नातलगांना ५ ते २० लाखांदरम्यान नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले.  

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परदेश दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातलगांना २ लाख, तर जखमींना ५० हजारांची नुकसान भरपाई घोषित केली. किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजारांची नुकसान  भरपाई उ. प्र. सरकारने जाहीर केली.  उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. 
बातम्या आणखी आहेत...