आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यात या अवस्थेत आढळला तरुणीचा देह, लोकांनी लगेच कपड्याने झाकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबिकापूर - सरगुजामध्ये एका नाल्यात एका तरुणीचा नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तरुणी गवत कापून आणते म्हणून घरातून निघाली होती. संध्याकाळी गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्यांना तिचा मृतदेह आढळला. नाल्यात तिचा नग्न मृतदेह दिसताच तिच्या घरच्यांना त्यांनी माहिती दिली.
 
असे आहे प्रकरण...
- ही घटना सीतापूरमधील धरमपूर परिसरातील आहे. खडादोरना गावातील रहिवासी सपत राम नागवंशी यांची 18 वर्षीय मुलगी ललिता सकाळी 10 वाजता गवत कापून आणते म्हणून घरातून बाहेर पडली होती.
- ती मंगरैलगड मंदिराजवळील एका नाल्याजवळ गवत कापायला गेली होती. यानंतर घरी परतली नाही.
- संध्याकाळी चार वाजता गुराखी त्यांच्या गुरांना चारायला तेथे आले तेव्हा त्यांनी तिचा नग्न मृतदेह तेथे पाहिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
- तरुणीच्या शरीरावर फक्त सलवार होती. यामुळे हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. घटनास्थळाजवळूनच तिने गवत कापायला आणलेले साहित्य हस्तगत करण्यात आले.
- पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
- सूत्रांनुसार, अगोदर तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि मग तिचा खून करण्यात आल्याचा कयास लावला जात आहे. तथापि, पीएम रिपोर्टनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...