आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nursery Girl Student Killed In Elevator In Hyderabad

हैदराबादः शाळेच्या इलेव्हेटरमध्ये चिरडून 3 वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच शाळेतील इलिव्हेटरमध्ये चिरडून या चिमुकलीचा मृत्यू झाला. - Divya Marathi
याच शाळेतील इलिव्हेटरमध्ये चिरडून या चिमुकलीचा मृत्यू झाला.
हैदराबाद- शाळेच्या एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बसविलेल्या इलेव्हेटरमध्ये आज (मंगळवार) सकाळी तीन वर्षांच्या चिमुकलीचा पाय अडकला. त्यानंतर त्यात चिरडून तिचा करुण अंत झाला. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी चीनमध्ये अशा दुर्दैवी घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर चिमुकलीच्या आईवडीलांसह इतर पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या दुर्दैवी चिमुकलीचे नाव झैदा झैनब असे आहे. श्री चैतन्य शाळेत ती नर्सरीला होती. आज सकाळी शाळा भरली. त्यानंतर शाळेची शिक्षिका इतर चिमुकल्यांसह तिला इलेव्हेरने तिसऱ्या मजल्यावर नेत होती. यावेळी ती इलेव्हेटरच्या पायऱ्यांवर पडली. तिचा पाय इलेव्हेटर बेल्टमध्ये अडकला. त्यानंतर ती त्यात चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिमुकलीच्या आईवडीलांसह इतर पालकांनी शाळेसमोर उग्र आंदोलन केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस बोलविण्यात आले.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....