आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी चिमुकल्याला मागावी लागली भीक, खासदाराने केली मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी या चिमुकल्याला भीक मागावी लागली. - Divya Marathi
रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी या चिमुकल्याला भीक मागावी लागली.

पाटणा- आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने एका 10 वर्षाच्या मुलाने गावोगावी फिरत भीक मागितल्याची घटना घडली आहे. काही लोकांनी मुलाची विचारपूस केल्यावर ही घटना समोर आली. या महिलेला खासगी रुग्णालयाने 70 हजाराचे बिल दिले होते. यापैकी निम्मे पैसे महिलेने दिले सुध्दा होते पण तरीही डॉक्टर व रुग्णालय प्रशासन तिला सोडण्यास तयार नव्हते. एवढंच नाही तरी त्यांनी तिचे शस्त्रक्रिया केलेले टाके सुध्दा काढले नाहीत. खासदार पप्पू यादव यांनी पोलिसांनी बोलविल्यावर रुग्णालय प्रशासन नमले. 

 

गर्भवली महिलेला 16 दिवसांपूर्वी लागले होते दुखू
- महिला आणि तिचे कुटूंब मधेपुरातील हनुमान नगर भागात राहते. 16 दिवसांपूर्वी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. तिचे कुटूंब तिला सहरसा येथील एका रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यांनी तिला उपचारसाठी पाटणा येथे जाण्यास सांगितले. 

- तेथे डॉक्टरांनी तिच्याकडून 5 हजार रुपये घेतले आणि महिलेला पाटणा येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिला 70 हजाराचे बिल देण्यात आले. 

- महिलेने अर्धे बिल भरले पण रुग्णालयाने तिला पुर्ण पैसे भरल्याशिवाय सोडण्यास नकार दिला. तिचे टाकेही काढण्यात आले नाहीत. त्यानंतर तिचा मुलगा पैशासाठी गावोगावी भीक मागू लागला. 

 

विनापरवानगी सुरु होते रुग्णालय
- या घटनेची माहिती मिळाल्यावर खासदार पप्पू यादव तेथे पोहचले. पोलिसांना बोलविल्यानंतर रुग्णालयाने महिलेचे बिल माफ करत तिला घरी पाठवले.
- तपासात हे रुग्णालयात बेकायदेशीररित्या विनापरवानगी सुरु असल्याचेही समोर आले. 

 

हॉस्पीटलने आरोप नाकारले
-  डॉ. निशा भारती यांनी आरोप नाकारताना आपल्याला या प्रकरणाची माहिती नव्हती असे सांगितले. तर महिलेच्या पतीने डॉ. निशा भारती यांना हा सगळा प्रकार माहिती होता व त्यांनीच शस्त्रक्रिया केली होती असे सांगितले. 

 

खासदार म्हणाले, रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे
- खासदार पप्पू यादव म्हणाले, अनेक रुग्णालये विनापरवाना सुरु आहेत. डॉक्टर नागरिकांच्या परिस्थितीचा फायदा उचलत आहेत. कट प्रॅक्टिसचा प्रकारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. असा प्रवृत्तींविरोधात सक्त कारवाईची गरज आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...