आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील आमदारांचे वेतन 99 वरून 1 लाख 77 हजार, हरियाणातील आमदारांना मिळेल 2.10 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकांपूर्वीच आमदारांच्या वेतनात एक मोठी बंपर वाढ केली गेली आहे. त्यामुळे या आमदारांचे वेतन आता 99 हजाराच्या जागी 1लाख 70 हजार रुपये प्रतिमाह एव्हढे असेल. यात मजेशीर गोष्ट ही आहे की, एरव्ही एकमेकाला पाण्यात पाहाणारे सर्व आमदार या मुद्द्यावर मात्र एकत्र आलेले दिसले. या जबरदस्त वेतनवाढीने सरकारी खजिन्यावर अब्ज 28 कोटी 89 लाख रुपयाचा बोजा पडणार आहे. या प्रकरणी सत्ताधारी पक्ष समाजवादी पक्षाचे म्हणणे आहे की, वाढती महागाईच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढ आवश्यकच होती. युपी विधानसभेत मान्सुन अधिवेशनात गुरुवारी विधेयके पारीत करण्यात आली.

हरियाणातील आमदारांचे वेतन पंतप्रधानांपेक्षाही अधिक
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी हरियाणा विधानसभेत आमदारांचे वेतन, भत्ता तथा पेंशन संशोधन विधेयक मंजूर झाले. यामुळे आता आमदारांचे वेतन 64.7% वाढणार आहे. त्यांना एकूण वेतन 1,27,500 रुपयावरुन वाढून 2.10 लाख रुपए प्रतिमाह मिळेळ. यामुळे आता असे समजायला हरकत नाही कि, हरियाणातील आमदारांचे वेतन अाता पीएम नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही अधिक झाले आहे. पीएम मोदी यांना 1.60 लाख रुपए प्रतिमाह वेतन मिळते.
बातम्या आणखी आहेत...