आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयललितांचे विश्वासू ओ पनीरसेल्व्हम तामिळनाडुचे नवे मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - ज्ञात उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी शनिवारी एआयएडीएमके नेत्या जयललिता यांना चार वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांचा वारसदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. आज (रविवार) सकाळपासून बेंगळुरु सेंट्रल जेलमध्ये एआयए़डीएमकेच्या नेत्यांनी जयललिता यांची भेट घेऊन आणि त्यानंतर पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत पक्षाचे नेते ओ पनीरसेल्व्हम यांना तामिळनाडुचे नवे मुख्यमंत्री निवडण्यात आले आहे.
पक्षाच्या आमदारांची रविवारी बैठक झाली त्यात ओ पनीरसेल्व्हम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दुसरीकडे जयललिता यांना शिक्षा सुनावल्यामुळे दुःखु झालेल्या त्यांच्या एका समर्थकांने आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कांचीपुरम गावातील बाबू नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीने झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. जयललिता यांना शिक्षा सुनावल्यामुळे तो अस्वस्थ होता असे, पोलिसांनी सांगितले आहे.
कोण आहेत पनीरसेल्व्हम
तामिळनाडुचे अर्थमंत्री राहिलेले ओ पनीरसेल्व्हम हे राज्यातील बोदिया कुन्नूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जयललिता यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. याआधीही ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहे. 2001 मध्ये तांसी जमीन घोटाळा प्रकरणात जयललिता यांना शिक्षा झाली होती, तेव्हा आमदार असलेल्या पनीरसेल्व्हम यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. पनीरसेल्व्हम हे थेवर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.