आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लिओन-गुगल सीईओ विरोधात FIR, अश्लिलतेचा प्रसार करण्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर - राजस्थानच्या अजमेर येथे अभिनेत्री सनी लिओन, गुगलचे सीईओ लॅरी पेज आणि बॉलिवूडच्या एका नियतकालिकाविरोधात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अजमेर पोलिस स्टेशनचे एसएचओ जितेंद्र गंगवानी यांच्या माहितीनूसार, अरंजिया जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखर करण्यात आला आहे.
जैन यांचे म्हणणे आहे, की त्यांनी एक बॉलिवूड नियतकालिक खरेदी केले. त्यात सनी लिओनची अश्लिल छायाचित्रे होती. त्या नियतकालिकात एका वेबसाइटची लिंक देण्यात आली होती. त्या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर तिथे सनीचा काही अॅडल्ड कंटेट सापडला. त्यानंतर जैन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सनी अश्लिल साहित्याचा प्रसार करत असल्याचा जैन यांचा आरोप आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 292 (अश्लिल साहित्य प्रसारित करण्याविरोधातील कलम) नुसार आणि इतर काही कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.
पोर्न स्टारची बॉलिवूड अभिनेत्री झालेल्या सनी लिओनविरोधात दाखल झालेली ही पहिली तक्रार नाही. याआधी मुंबईतील डोंबिवली येथील रामनगरमध्ये एक आठवड्यापूर्वीच एका महिलेने आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली होती. तिच्याविरोधात इंटरनेटवर भावना भडकवणारे आणि अश्लिल साहित्याचा प्रसार करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
गोव्यातील मडगाव येथील रहिवासी अरुण परुळेकर यांनीही सनी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी सनीवर पोर्न साइट चालवण्याचा आरोप केला आहे.