आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी वादळाने तामिळनाडू व केरळात आतापर्यंत 16 जणांना मृत्यू, कन्याकुमारीत प्रचंड नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कन्याकुमारी- ओखी वादळाने तामिळनाडू आणि केरळमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक भागांत पिकांचे आणि वस्त्यांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात मुसळधार पावसाने रस्ताच वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.


नौदलाच्या पाच शिप रवाना  
- नेव्हीच्या माहितीनुसार दोन AN32 एअरक्राफ्ट्सने समुद्रात सुमारे 25 जण फसलेले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या लोकेशनची माहिती बचाव पथकांना दिली ाहे. 
- कोच्चीहून नेव्हीच्या 5 शिप रेस्क्यूसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. 
- केरळ पोलिसांच्या मते समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांचा नेमका आकडा समोर आलेला नाही. पण ही संख्या 80 च्या आसपास असू शकते. 
- मच्छिमारांच्या फॅमिलिनी आरोप केला आहे की, केरळ सरकारकडून त्यांना वादळाबाबत काहीही इशारा देण्यात आला नव्हता. 


वादळाबाबत काय म्हटले हवामान विभागाने?
- हवामान विभागाने म्हटले आहे की, शुक्रवारी सॅटेलाइट इमेज आणि रजारद्वारे मिळालेल्या माहितीनुसार 'ओखी' ताशी 25 किमी वेगाने पुढे सरकत आहे. 
- 'ओखी' मुळे तमिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, गुरुवारी ताशी 65 ते 75 किमी वेगाने हवा वाहत होती.  वादळामुळे अनेक झाडे, इलेक्ट्रीक पोल कोसळले, काही इमारतींचेही नुकसान झाले. 
- कन्याकुमारी, तूतिकोरिन आणि रामनाथपुरमसह राज्याच्या इतर किनारी भागांत पुढच्या 24 तासांसाठी मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या मते, कोइम्बतूर, पद्दुचेरी आणि चेन्नईमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. 


असे पडले 'ओखी' नाव 
- हवामान विभागाच्या संचालकांनी सांगितले की, या वादळाला बांगलादेशने ओखी असे नाव दिले आहे. अरबी समुद्राकडे पुढे जाण्याची याची शक्यता आहे. सध्या मिळत असलेल्या संकेतांनुसार 'ओखी' हे अत्यंत धोकादायक समजले जात आहे. 
- वादळामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही दौऱ्याची तारीख पुढे ढकलली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...