आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या विधानसभेत ‘ग्रेट पॉलिटिकल ड्रामा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर- राजकीय नेते मंडळी आपल्या मागणीसाठी विधिमंडळात सर्व संकेत, नियमांचे पालन करून सभ्यपणे म्हणणे मांडू शकतात; परंतु अनेक वेळा अतिरेकी आग्रहाचे रूपांतर झाल्यानंतर काय घडते, याचा प्रत्यय सोमवारी ओडिशाच्या विधानसभेत आला. वार्षिक अर्थसंकल्पाच्या वेळी आमदारांनी चांगलाच गदारोळ घातल्याचे दिसून आले.
आमदारांची कसरत
सरकारची भूमिका लक्षात न घेता त्याला विरोध करताना काही आमदारांनी सभापतींच्या वेलमध्ये बळजबरीने असा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी एकच गोंधळ उडाला. अनेक आमदार अशा पद्धतीने आसनाकडे प्रवेश करत होते.