आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नद्या कोपल्या : ओडिशामध्ये पूर परिस्थिती गंभीर;पावसाचे 23 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - ओडिशामधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून महानदी नदीवर गंभीर पूर संकट उभे आहे. प्रशासनाने नदी काठावर व सखल भागात राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. पूरग्रस्त गावांना वाहतूक व जीवनावश्यक साहित्य पुरविले जात आहेत.

राज्यात पूर-पावसाशी संबंधित 23 बळी गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. महानदी आणि बैतरणा नद्या कोपल्या असून आसपासच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली असून विशेष मदत आयुक्ताच्या नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट दिली आहे.

कटक, जगतसिंगपूर सह 7 जिल्ह्यांना धोका
कटक, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, पुरी, बुध, खुर्डा आणि नायगड जिल्ह्यांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्हा प्रशासनांना योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सखल भागातील 47 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महानदी नदी कटकनजीक धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.