आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंरोजगार योजनेत ओडिशा प्रथम,सर्वाधिक स्वयंरोजगाराची निर्मिती करणारे राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने (एसजेएसआरवाय) अंतर्गत ओडिशा सर्वाधिक स्वयंरोजगार पुरवणारे राज्य ठरले आहे, अशी माहिती अधिका-याने दिली. 2012-13 या वर्षासाठी ओडिशाला राष्‍ट्रीय पुरस्कार मिळाल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण, गरिबी निर्मूलन मंत्रालयाने कळवली आहे.
मुख्य सचिवांच्या कार्यालयात कार्यालयीन अधीक्षकपदावर कार्यरत दिलीप राऊतराय यांना या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय जाते. एसजेएसआरवाय केंद्र व राज्य सरकारची संयुक्त योजना आहे. ओडिशामध्ये स्वयंरोजगार योजनेअंतर्गत साधारण 1 लाख रुपये निधी देण्यात आला. अन्य राज्याच्या तुलनेत हा निधी जास्त आहे. 2012-13 च्या एसजेएसआरवाय योजनेत राज्याच्या वाट्यासह केंद्राने 2,226 लाख रुपये निधी दिला होता. या वर्षात साधारण 3,447 लाख रुपयांच्या निधीचा वापर झाला. खर्चाचे हे प्रमाण 155 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
कर्मचा-यांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात 30,389 पेक्षा जास्त लोकांनी यात सहभाग घेतला. या वर्षात 23 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 7 कोटी रुपये निधी वापरला जात आहे. ओडिशाने स्वयंरोजगार योजना राबविताना उद्दिष्टपूर्ती केली असून हे राज्य 2012-13 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.