आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Odisha Law Minister Raghunath Mohanty Quits After Dowry Torture

ओडिशाचा कायदामंत्रीच हुंडाबळीचा आरोपी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप ओडिशाचे कायदामंत्री रघुनाथ मोहंती यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मोहंती यांची सून वर्षाने गुरुवारी बालासोरमध्ये एफआयआर दाखल केला. त्यात पती राजश्री मोहंती, सासरे रघुनाथ मोहंतींसह अन्य तीन सदस्यांची नावे आहेत. हुंड्यासाठी सासरची मंडळी आपला छळ करत आहे. 25 लाख रुपये आणि एका लक्झरी गाडीची ते मागणी करत आहेत, असा आरोप वर्षाने केला आहे. पती राजश्री निवडणूक लढवण्यासाठी एसयूव्ही लक्झरी गाडीची मागणी करत आहे, असे तिचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी लग्नाच्या वेळीही माहेरच्या मंडळींनी 10 लाख रुपये रोख आणि दागिणे दिले होते. तरीही आपला छळ होत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. शुक्रवारी ओडिशा विधानसभेत हे प्रकरण गाजले.