आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offensive Information About Pandit Nehru On Wikipedia Page

नेहरूंविषयी विकिपीडिया पेजवर चुकीची माहिती, काँग्रेसचा मोदींवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी संबंधित विकिपीडिया पेजवरून नवा वाद उद््भवला आहे. या पेजवर नेहरूंचे आजोबा मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. इतकेच नव्हे, तर नेहरूंच्या आजोबांनी ब्रिटिशांपासून आत्मरक्षण करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारल्याचेही यात लिहिले आहे. याविषयी काँग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरले आहे. मोदींनी याचा खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली.

मोदी सरकारने विकिपीडिया पेजवर मजकुरात बदल करून नेहरूंना मुस्लिम दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरद्वारे (एनआयसी) हे बदल करण्यात आल्याचे आयपी अॅड्रेसवरून दिसून येत असल्याचे सुरजेवाला म्हणतात. हे घृणास्पद कृत्य अाहे. नेहरू कोणीही असोत, ते सर्वप्रथम भारतीय होते. या देशाच्या घटनानिर्मितीत त्यांचे अमूल्य योगदान होते. त्यांनी प्रत्येक धर्म व जातीला समान स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे काँग्रेस प्रवक्त्याने म्हटले आहे. विकिपीडिया पेजवर बदल करणाऱ्यांवर कारवाई होईल का, असा प्रश्नही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.

असे आले प्रकरण उघडकीस
विकिपीडियाच्या एडिट्सवर निगराणी ठेवणाऱ्या ट्विटर हँडलने या प्रकरणाचा सर्वप्रथम खुलासा केला. त्यानंतर ट्विटवर याची माहिती दिली. सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे संचालक प्रकाश यांनी सांगितले की, हे सर्व बदल एकाच आयपी अॅड्रेसवरून करण्यात आले आहेत. हा आयपी अॅड्रेस एनआयसीचा असल्याचे प्रकाश सांगतात. यात म्हटले आहे, नेहरूंचे आजोबा गंगाधर यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे नाव गयासुद्दीन गाजी होते. ब्रिटिशांपासून वाचवण्यासाठी त्यांना ‘गंगाधर’ नाव देण्यात आले. यात नेहरू -एडविना यांच्या प्रेमप्रसंगाचाही उल्लेख आहे.