आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officer In Charge And Three Cops Injured In Maoist\'s Landmines Blast In Jharkhand

नक्षलवाद्यांनी भुसूरुंग स्फोटात पोलिसांची जीप उडविली, पोलिस अधिका-यासह तीन जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/खूंटी - रांचीला लागून असलेला देशातील सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्हा खूंटी येथे भाकपा माओवादी संघटनेच्या नक्षलवद्यांनी घडवून आणलेल्या भुसूरुंग स्फोटांमध्ये पोलिसांची जीप उडवून देण्यात आली. यात एका पोलिस अधिका-यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना मुरहू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोटनो गावात आज (मंगळवार) पहाटे घडली. जखमी पोलिस अधिकारी प्रवीण झा आणि इतर तीन पोलिस कर्मचा-यांना खूंटी येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन रांचीला हलविण्यात आले आहे. सर्व पोलिस कर्मचारी आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
खुंटीचे पोलिस अधिक्षक अनीश गु्प्ता घटनास्थळी रवाना झाले आहेत. ते म्हणाले, निवडणूकीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचे एक पथक पेट्रोलिंगसाठी गेले होते, त्याचवेळी हा हल्ला झाला. या भागात कोंबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
छायाचित्र - नक्षलवाद्यांनी उडवून दिलेली पोलिसांची जीप.