आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerala Government Website Hacked By Pakistan Cyber Attacker

पाकिस्‍तानने केली केरळ सरकारची वेबसाइट हॅक, लिहिले पाकिस्‍तान जिंदाबाद !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोट्टयाम - पाकिस्तानी हॅकर्संनी केरळ सरकारची अधिकृत वेबसाइट "www.kerala.gov.in शनिवारी रात्री हॅक केली. दरम्‍यान, त्‍यावर भारत विरोधी मजकुर अपलोड केला. त्‍यात लिहिले, 'भारतीयांना आपण सुरक्षित असल्‍याच्‍या भ्रमात जगत आहेत, आम्‍ही पाकिस्‍तानी हॅकर्स आहोत' असा संदेशही होमपेजवर लिहिला असून, 'पाकिस्‍तान जिंदाबाद'चा नाराही पोस्‍ट केला आहे. दरम्‍यान, केरळ साइबर शाखा याचा तपास करत आहेत.
नेमके काय पोस्‍ट केले हॅकर्सने
केरळ सरकारच्‍या अधिकृत वेबसाइटला हॅक केल्‍यानंतर हॅकर्सने त्‍यावर संदेश लिहिला की आम्‍ही पाकिस्‍तानी आहोत. भारतीयांना ते सुरक्ष‍ित आहेत, असे वाटत असेल तर तो त्‍यांचा भ्रम आहे, असा मजकुर त्‍यावर अपलोड करून भारतीय राष्‍ट्रध्‍वज जाळत असलेला फोटोसुद्धा पोस्‍ट केला.
मुख्‍यमंत्री म्‍हणाले हा प्रकार गंभीर
या बाबत मुख्यमंत्री ओमन चांडी आज (रविवार) पत्रकारांना महणाले, हा प्रकार अत्‍यंत गंभीर आहे. वेबसाइट हॅकर्सपासून मुक्‍त केली असून, ती सुरळीत करण्‍याचे काम सुरू आहे. हॅकर्सने या साइटचे सर्वर हॅक केलेले नव्‍हते.
कोच्ची मेट्रो रेल्‍वेची बेवसाइट केली होती हॅक
एप्रिल 2015 मध्‍ये हॅकर्संनी कोच्ची मेट्रो रेल्‍वेची बेवसाइट हॅक केली होती. त्‍यावर इस्राइल विरोधी मजकूर पोस्‍ट करण्‍यात आला होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...