आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 लाखांच्या जुन्या नोटा जप्त, 2 अटकेत, आरोपी फारूक आणि महंमद शफी दोघे भाऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरच्या बढगाम येथील रेल्वे पोलिसांनी दोन भावांकडून ३७ लाख २० हजारांच्या  पाचशे-हजारांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा पकडल्या. त्यांना पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपींचा दहशवाद्यांशी काही संबंध आहे काय? याचीही चौकशी करण्यात येत आहे.  

रेल्वे पोलिसांतील दोन जवानांना या तरुणांचा संशय आला. ते मजहामा रेल्वेतून जाणार  होते. संशयावरून त्यांना रोखण्यात आले.त्यांच्या बॅगेची तपासणी घेण्यात आली. त्या बॅगेत हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. त्यानंतर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्यांना या नोटांबाबत योग्य माहिती देता आली नाही. फक्त ही रक्कम आमची आहे, इतकेच ते सांगत होते. परंतु त्याचा पुरावाही त्यांना देता आला नाही. नोटाबंदीच्या काळात या नोटा बँकेत जमा का केल्या नाहीत? या प्रश्नावरही त्यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. या दोघांची ओळख फारुक अहमद आणि महंमद शफी अशी पटली आहे. ते संुबल येथे राहणाऱ्या अब्दुल रहमान लाबरुची मुले आहेत. पोलिस आता त्यांच्या पालकाचा शोध  घेत आहेत. या मुलांकडे इतकी रक्कम कोठून आली याचीही विचारणा ते करतील. तसेच या  दोघांच्या कोण कोण संपर्कात होते किंवा सध्या आहेत? याचाही शोध घेतला जात आहे. या नोटा कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार होत्या याचाही शोध घेतला जातोय.
बातम्या आणखी आहेत...