आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Best Friends Nitish Lalu After 5 Years Seen On One Stage

जुने जिवलग मित्र नितीश-लालू तब्बल 5 वर्षांनी एका मंचावर होते उपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - जुने जिवलग मित्र अन् आताचे कट्टर विरोधक बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूप्रसाद यादव शनिवारी पाच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले. सर्वात आधी लालू बोलले. पाठोपाठ शिंदे व नंतर नितीशकुमार. लालूंना कोपरखळी मारत नितीश म्हणाले, आजकाल काही बुजुर्ग मंडळीही ट्विटरवर आली आहे. ट्विट काय असते, हे आधी जाणून घ्या. चिमण्यांच्या चिवचिवाटाला ट्विट म्हणतात. नवख्या मंडळीकडून चिवचिवाट होतच असतो. मात्र बुजुर्गांकडूनही चिवचिवाट होत असेल तर त्याला काय म्हणावं?
तत्पूर्वी, लालू नितीश यांच्या रोखाने म्हणाले, सरकारी जाहिरातींचे वृत्तपत्राचे उद्दीष्ट असेल तर निप:क्ष बातम्या येऊ शकणार नाहीत. सरकारपुढे झुकणार्‍या वृत्तपत्राचा अंतच होईल. ..मात्र बिचार्‍या पत्रकारांनी करावे तरी काय? सरकारविरोधी बातम्या छापल्या तर जाहिराती बंद करू, अशी भीतीच त्यांना आहे.
लालू पुढे म्हणाले, आता तर सरकारची बातमी-फोटो कुठे कसा लागेल, हेही ठरलेले असते. त्यामागे लालूविरुद्ध काही ना काही छापलेच पाहिजे, हा उद्देश असतो. उत्तरादाखल नितीश म्हणाले, सत्तेत आल्यानंतर कोण कसे आपले फोटो ठरवतो याची सर्व माहिती सर्वांना आहे. नितीश यांनी दै. भास्करला शब्द दिला. ते म्हणाले, ‘तुम्ही कोणतीही बातमी छापा. हीच बातमी छापली, ती का नाही छापली म्हणून मी किंवा माझ्या कार्यालयातून कधीही तुम्हाला फोन येणार नाही.’
दैनिक भास्करच्या पाटणा आवृत्तीचा शनिवारी शुभारंभ. झाला. या समूहाची 14 व्या राज्यातील पाटणा ही 67 वी आवृत्ती आहे. योगायोग म्हणजे आठ दिवसांवर आलेला भारताचा प्रजासत्ताकदिनही 67 वाच आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दैनिक भास्करचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचीही समयोचित भाषणे झाली.