आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्‍या प्रेमाच्या सात कथा : या वयस्कर तरुणांची प्रेम प्रकरणे झळकली मीडियात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होलाराम हरियाणी आणि माधुरी - Divya Marathi
होलाराम हरियाणी आणि माधुरी
कोटा/अजमेर : ख-या प्रेमात वयाचे आणि जातीचे बंधन नसते. बस एकमेंकांवर जीव जडतो. व्हेलेन्टाइन आठवड्यानिमित्त divyamarathi.com अशाच काही अनोख्‍या लव्ह स्टोरीजविषयी सांगणार आहोत. यात त्या जोडप्यांच्या प्रेमाची कथा आहे, ज्यात वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्या प्रेमाची आणि संघर्षाची कथा मनोरंजक आहे.
कोण आहेत हे जोडपे...
भन्नाट आहे गुगल सीईओच्या सासरेबुवांची प्रेम कहाणी...
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे 73 वर्षांचे सासरे होलाराम हरियाणी यांनी मागील वर्षी 65 वर्षांच्या माधुरी शर्माशी विवाह केला. हरियाणी यांची पत्नी निलूची दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. दुसरीकडे त्यांच्याशी विवाह करणा-या माधुरी शर्मा यांचे पती राजेश चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. दोघेही एकटे होते. सत्संगात भेट झाली. भेटीतून प्रेम वाढले. शेवटी 23 सप्टेंबरमध्‍ये दोघांनी आर्य समाज मंदिरात विवाह केला.
कसे दोघे आले जवळ?
माधुरी या कोटाच्या आहेत. त्यांचा विवाह दिल्लीतील राजेश शर्माशी झाला होता. ते लष्‍कराच्या रस्ते बांधकाम शाखेत होते. त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. माधुरी यांच्या एकुलत्या एक मुलगा भारत याचाही अपघातात मृत्यू झाला होता. त्या दिल्लीहून दोन वर्षांपूर्वी त्या कोटाला आल्या. येथील नयापूरमध्‍ये फ्लॅट घेऊन राहू लागल्या.
पॉलिटेक्निकमध्‍ये प्राध्‍यापक राहिलेले हरियाणी मुंबईत राहत होते. एक वर्षापासून ते कोटात राहत आहेत. येथे ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा एक मुलगा न्यूजर्सीमध्‍ये कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक आहे, तर मुलगी अंजली सॅन फ्रान्सिस्कोत राहतायत. अंजलीचे पती सुंदर पिचाई गुगलचे सीईओ आहे. हरियाणी यांनी सांगितले, की काही महिन्यांपूर्वी दोघेही जयपूर गोल्डनजवळील एका आश्रमात सत्संगात भेटले. विचार जुळले आणि दोघांनी विवाहा करण्‍याचा निर्णय घेतला.
विरोध झाला, पण माधुरी मागे हटल्या नाही
माधुरी यांचे इतर नातेवाईक बरोबर होते. मात्र कोटात राहणारे माहेरची लोक त्यांच्या विरोधात होते. त्यांची पुतणी आणि पुतण्‍याने विरोध सुरु केला. त्यांनी माधुरी यांच्या विरोधात भडकवण्‍यास सुरुवात केली. त्या दोघांचा डोळा त्यांच्या संपत्तीवर होता. सोसायटीच्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. परंतु मला जे करावेसे वाटले ते मी केले.
एकटे राहणे अशक्य होते
या वयात एकेक दिवस व्यतीत करणे अवघड असते, याची मला जाणीव होती. मी पतीच्या निधनानंतर चार वर्षे एकाकीच घालवले आहे. अमेरिकेत राहणारी तिची चुलत बहिणींनी दुसरा विवाह करायला सांगितले आणि मी तसे केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा 68 वर्षांचा वर आणि 62 वर्षांची वधूची कथा...