आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old Ritual Of Live In Relationship In Villagers Of Abu Road Rajasthan

आदिवासी परंपरा : Live in द्वारे जन्मलेली मुले लावून देतात आई वडिलांचा विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुरोड - सुप्रीम कोर्टाने वर्षभरापूर्वी लिव्ह इन रिलेशनशीपवर कायद्याची मोहोर लावत त्याला मान्यता दिली होती. पण राजस्थानच्या अबुरोड येथील अनेक आदिवासी गावांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपची कन्सेप्ट फार जुनी आणि समाजमान्य आहे. आदिवासींच्या या परंपरेतील एक रंजक तथ्यही आहे. ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांची मुलेच मोठी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांचा विवाह लावून देतात. दरवर्षी गणगौर मेळ्यात मुले मुली आपले लिव्ह इन पार्टनर शोधतात. यंदा हा मेळा गुरुवारी संपन्न झाला. त्यातही तरुण तरुणींनी त्यांचे लिव्ह इन पार्टनर निवडले.

असा ठरतो पार्टनर
दरवर्षी एप्रिल महिन्यात गणगौर मेळा भरतो. यात मुले मुली एकमेकांची निवड करून पळून जातात. ते आपले गाव सोडून दुसऱ्या गावात पती पत्नीसारखे जाऊन राहतात आणि कुटुंबीयांनाही त्याबाबत माहिती देतात. दोन्ही कुटुंबे तयार असल्यास त्या दोघांचे लग्न लावून दिले जाते, अन्यथा ते जीवनभर लिव्ह-इनमध्येच राहतात. लिव्ह इनमध्येच त्यांना मुलेही होतात. पण प्रथा ही पुढे आणखी रंजक बनते. लिव्ह इन मध्ये जन्मलेली ही मुले आपला साथीदार निवडण्यापूर्वी आपल्या आई वडिलांचा विवाह लावून देतात. त्यानंतर त्यांना आदिवासी समाजात मान्यताही मिळते. त्यानंतर ते पुन्हा गावी परतण्यास स्वतंत्र होतात.

गणगौर मेळा
आदिवासींमध्ये हा मेळा चांगलाच लोकप्रिय आहे. मुले मुली दरवर्षी त्याची वाट पाहत असतात. गणचा अर्थ शिव आणि गौरा म्हणजे पार्वती माता. मेळ्यात गणगौरच्या मातीने बनलेल्या मूर्त्यांची एका रात्रीपूर्वी पुजा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. जवळपास संपूर्ण आदिवासी समाज या मेळ्यात सहभागी होत असतो. मेळ्याची जबाबदारी वरिष्ठांवरच असते. मुले मुली जेव्हा पार्टनर शोधून त्यांना पळवून नेतात त्याला ‘खींचना’ प्रथा म्हणतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मेळ्याचे PHOTOS