आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकटीसोबत साखरपुडा; भावी पत्नीच्या मोठ्या बहिणीवर बलात्कार, पीडितेने सांगितली आपबिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- साखरपुड्यानंतर एका तरुणाने होणार्‍या पत्नीच्या थोरल्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामात आरोपीला त्याच्या आईने मदत केली आहे.

नराधमाने पीडितेच्या चहामध्ये गुंगीचे औषध टाकले. तिचे अपहरण केले. तिला उत्तर प्रदेशात नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पीडिता विवाहीत आहे. पीडितेने नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून लुधियाना गाठले आणि पोलिसांना आपबिती सांगितली.

- आकाश ( रा. आंबेडकर कॉलनी इंडस्ट्रियल एरिया लुधियाना) असे आरोपीचे नाव आहे. कैलाशो असे आरोपीच्या आईचे नाव आहे.
- घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
- पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी आकाश आणि त्याच्या आईने तिला घरी चहा पिण्याच्या बहाण्याने बोलावले होते. चहामध्ये त्यांनी आधीच गुंगीचे औषध टाकले होते. चहा प्यायल्यानंतर तिची शुद्ध हरपली. नंतर आकाश तिला उत्तर प्रदेशात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोंग्राफिक्समधून जाणून घ्या, आई मुलाने घरी बोलवून पीडितेचे केले असे हाल...

(टीप: फोटोजचा वापर केवळ स्टोरी प्रेझेंटेशनसाठी करण्‍यात आला आहे. )
बातम्या आणखी आहेत...