आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात वयोवृद्ध भारतीयाचे 135 व्या वर्षी आसाममध्‍ये निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरियागाव - आसाममधील मोरियागाव जिल्ह्यातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे बुधवारी निधन झाले. बारीबंधा गावात राहणा-या या व्यक्तीचे नाव पुना कोंवार असून त्यांचे वय 135 होते. पाच पिढ्यांचे साक्षीदार कोंवार यांच्या दीर्घायुष्याबद्दल सर्वांनाच कुतूहल होते. त्यांचे खापरपणतू 68 वर्षांचे असून त्यांनी जनगणना संचालनालयाला पाठवलेल्या कागदपत्रांद्वारे त्याचप्रमाणे कुटुंबीयांकडे असलेल्या वयाच्या दस्तऐवजांवरून मोरियागाव पोलिसांनीही कोंवार यांच्या शतकोत्तर वयाची खातरजमा केली आहे.

कोंवार यांची दृष्टी आणि श्रवणशक्ती वयोपरत्वे कमी झाली असली तरीही दोन महिन्यांपूर्वीपर्यंत ते चांगलेच सक्रिय होते. बुधवारी नर्व्हस सिस्टिम निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. कोंवार यांच्या मुलाचे पणतू म्हणजेच त्यांचे तीन खापरपणतू कोंवार यांची काळजी घेत होते. मुलीकडूनही त्यांची पाचवी पिढी सध्या अस्तित्वात आहे.

133 व्या वर्षी मतदान
सन 2011 च्या आसाम विधानसभा निवडणुकीत कोंवार यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या वेळी मतदानाचा हक्क बजावणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले होते. त्या वेळी त्यांचे वय 133 वर्षे होते.