आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी २५ लाखांची गुटख्याची जाहिरात नाकारली’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - चित्रपटांतील भूमिका समरसून साकारणारे ओम पुरी आदर्शवादी आहेत. त्यांनी स्वत:चा एक अनुभव सांगितला. एकदा एका गुटखा कंपनीने त्यांना जाहिरातीसाठी २५ लाखांची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती फेटाळली. गुटखा आरोग्यासाठी घातक आहे हे त्याचे कारण. ‘भास्कर समूहा’ची प्रशंसा करताना ते म्हणाले, ‘सलग सहा दिवस गुन्ह्यांशी संबंधित बातम्या वाचल्यानंतर एक दिवस सकारात्मक बातम्या वाचल्याने बरे वाटते. चांगल्या बदलासाठी आपण स्वत:च पुढाकार घ्यायला हवा.’ त्यांच्याशी चर्चेतील प्रमुख मुद्दे...

स्वत:कडूनच प्रेरणा-स्पर्धाही आवश्यक
आयुष्यात आगेकूच करण्यासाठी स्वत:कडून प्रेरणा, स्पर्धा आवश्यक आहे. आपण आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग करत नाही. गरज भासली की क्षमता दिसते, हे मात्र खरे. सुनामीत बुडत असणार्‍या मुलीने प्राण वाचवण्यासाठी सुटकेसचा सहारा घेतला. हजारो मैल अंतर पोहून ती किनार्‍यावर पोहोचली. आपल्या अस्तित्वासाठी क्षमता वाढवण्याचे हे उदाहरण.

नेत्यांची वर्तणूक बदलली नाही तर लोकांची उदासीनता वाढेल
आमच्या संसदेत-विधानसभांमध्ये कॅमेरे लागले आहेत. खासदार मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत, बोलू देत नाहीत, मारहाण करतात, खुर्च्या फेकतात, असे दिसते. त्यांचे वय २०-२५ वर्षे नाही. बहुतांश जण ६० वर्षांवरील आहेत. त्यामुळे त्यांची वर्तणूक पाहून लोकांची उदासीनता वाढणे, नकारात्मकतेचा प्रसार होणे साहजिकच आहे. या नेत्यांनी आपली वर्तणूक बदलावी. गांधी, नेहरू, शास्त्रींसारखे नेते आता राहिले नाहीत. सध्याच्या नेत्यांनी वर्तणूक बदलली नाही तर लोक त्यांना गांभीर्याने घेणार नाहीत.

सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करावा
आपले सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न नेहमी करावा. कुठल्याही क्षेत्रात असा, सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करा.

पैसा जमवून काय कराल ?
लोकांमध्ये कमाईची स्पर्धा आहे. घर तर बनवले, पण ज्या रस्त्यावर सर्व चालतात त्यावरच चालायचे आहे ना?

खालच्यांकडे पाहा
आपण आपल्यापेक्षा वरच्या स्तराकडे पाहतो. त्यामुळे जास्त दु:ख होते. माझ्याएवढे दु:ख कोणी सहन केले नाही असा विचार योग्य नाही. माझ्यापेक्षाही जास्त दु:ख भोगलेल्यांनी माझ्यापेक्षा जास्त प्रगती केली आहे.