आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या वाढदिवशी हमसून-हमसून रडले होते ओम पुरी, वाचा असे काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटावा- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मुंबईत राहत्या घरी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ओम पुरी आपल्या शेवटच्या वाढदिवशी उत्तर प्रदेशातील इटावा येथील शहीद बीएसएफ जवान नितिन यादव यांच्या घरी पोहोचून हमसून- हमसून रडले होते.

'मी येथे प्रायश्चित करण्यासाठी आलो आहे. मी दुसर्‍या देशात शहीद जवानांविरोधात वक्तव्य केले असते तर माझे हात-पात कापण्यात आले असते', असे म्हणत ओम पुरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शहीद नितिन यादव यांच्या वडिलांची माफी मागितली. दरम्यान, ‘सैनिकांना लष्करात जा, गोळ्या खा, असे कोणी सांगितले होते?', असे वादग्रस्त वक्तव्य करून ओम पुरी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता.

वाढदिवशी शहीद जवानाच्या घरी पोहोचले होते ओम पुरी...
- नितिन यादव यांना एलओसीवर 2 ऑक्टोबरला वीरमरण आले होते.
- त्यानंतर ओम पुरी यांनी एका टीव्ही चॅनलवरील डिबेटमध्ये 'शहीद जवानाला सैन्यात भर्ती हो आणि गोळ्या खा असे कोणी सांगितले होते?, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.   
- ओम पुरी यांच्याविरोधात देशातील लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. परिणामी वाढदिवशी पश्चाताप करण्यासाठी ओमपुरी शहीद नितिन यादव यांच्या घरी पोहोचले होते.

शहीद नितिन यांच्या वडिलांची मागितली माफी... 
- ओम पुरी यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेला माल्यार्पण केले होते.  
- शहीद नितिन यांच्या वडिलांची गळाभेट घेऊन ओम पुरी हमसून हमसून रडले होते.  
- यावेळी ओम पुरी म्हणाले की, टीव्हीवरील चर्चेत मी शहीद जवानांचा अपमान केला होता. ती माझी चूक होती. त्या दिवसापासून मी अस्वस्थ होतो. मी भारत सोडून इतर देशात कुठे वक्तव्य केले असते, तर त्यांनी माझे हात-पाय कापले असते.

पुढील स्लाइड्सवरील फोटोजमध्ये पाहा, शहीद नितिन यांच्या घरी हमसून हमसून रडले होते ओम पुरी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...