श्रीनगर - काश्मीरमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रॅलीसाठी राज्याच्या विविध भागांतून समर्थकांना आयात केले गेल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. ओमर यांनी ही प्रतिक्रिया
ट्विटरवर नोंदवली आहे. जम्मू येथील बनिहाल येथून दोन ट्रेन भरून समर्थक जोडण्यात येत आले असल्याचे ओमर यांनी ट्विट केले आहे. हे भाजप समर्थक असूनही त्यांच्या हातात पार्टीचा झेंडा वा बॅनर दिसत नाही याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. रॅलीच्या स्थळापासून ओमर यांचे निवासस्थान अगदी जवळ आहे.
काही स्थानिक काँग्रेस समर्थक नेत्यांनाही या रॅलीसाठी लोकांना जमा करण्याचे सांगण्यात आले होते याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कूपवाडा जिल्ह्यातील विधायक व पूर्वी स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे नेते सज्जाद गनी लोन यांनीदेखील भाजपच्या रॅलीसाठी ८० वाहने पुरवली असल्याचा दावा ओमर यांनी केला आहे. मोदींच्या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात लोक पाठवण्यात येत आहेत.