आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदींच्या तोकड्या ज्ञानाची कीव येते, कलम 370 वर अहमदाबादमध्येही चर्चा करण्यास तयार\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना कलम 370 वर चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले, 'कलम 370 वर केव्हाही आणि कोठेही चर्चा करण्यासाठी मी कायम तयार आहे.'
जम्मू मध्ये एका रॅलीला संबोधीत करताना मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले, 'त्यांना चर्चा करायची आहे तर मी त्यासाठी तयार आहे. त्यांना जिथे हवी असेल तिथे मी चर्चा करण्यास तयार आहे. त्यांना अहमदाबादला चर्चा करायची असेल तर मी तिथेही येण्यास तयार आहे', असा दावा अब्दुल्ला यांनी केला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे ललकार रॅलीत कलम 370 मुळे काश्मीरचा काय फायदा झाला आहे, याची किमान चर्चा तरी करा असे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना ओमर यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
ओमर यांनी नरेंद्र मोदी यांना कलम 370 अभ्यासले आहे का? असा टोला हाणला. ते म्हणआले, त्यांनी हे कलम वाचलेले नसताना आणि त्यांना जम्मू-काश्मीरची काहीही माहिती नसताना ते याबद्दल वक्तव्य करत आहेत. कलम 370 मध्ये संपत्तीच्या अधिकाराबद्दल किंवा नागरिकत्वाबद्दलही उल्लेख नसल्याचा दावा ओमर यांनी केला आहे.
जम्मू-काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारे हे कलम असल्याचे सांगत त्यांनी मोदींना चर्चेचे खुले आव्हान दिले.
मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना ओमर म्हणाले, 'जी व्यक्ती एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि त्याहीपेक्षा मोठ्या पदाचे स्वप्न पाहात आहे. त्या व्यक्तीचे ज्ञान एवढे तोकडे असावे याचे आश्चर्य वाटते.'