आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Omar Thanks PM For Spending Diwali In Gurez And Asks For Mobile Connectivity For Area

मोदीजी धन्यवाद जवानांसोबत दिवाळी साजरी केली, आता तेथे कनेक्टिव्हिटीचेही पाहा -ओमर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी साजरी केली आता तेथे कनेक्टिव्हिटीचेही पाहा - ओमर - Divya Marathi
दिवाळी साजरी केली आता तेथे कनेक्टिव्हिटीचेही पाहा - ओमर
श्रीनगर - काश्मिरात जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पीएम नरेंद्र मोदींना धन्यवाद म्हटले. यासोबतच, मोदींनी ज्या ठिकाणी दिवाळी साजरी केली त्या गुरेज सेक्टरमध्ये फिजिकल आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे असा चिमटा देखील ओमर यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग चौथ्या वर्षी एलओसीवर गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच भारतीय जवानांना मिठाई खाऊ घालून येथे आल्याने आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते असे मोदी म्हणाले. 
 
 
आपण आलात तेथून ट्वीट होत नाही
>> ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केले, की "गुरेजचे लोक आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल पीएम मोदींना धन्यवाद... कृपया येथील स्थानिक आणि जवानांना राजदान पासिंगच्या खालून एक टनेल (बोगदा) भेट म्हणून द्यावे. महोदय, फिजिकल आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी येथील जवान आणि स्थानिकांसाठी सुद्धा सर्वात मोठी भेट ठरू शकते."
>> ट्विटरच्या माध्यमातून काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पीएम मोदींना चिमटा घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या सरकारवरही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या टीकास्त्र सोडले. 
>> आपल्या ट्वीटमध्ये ओमर अब्दुल्ला म्हणाले, "आपण पाहिलेच असेल येथून (गुरेज सेक्टर) ट्वीट करता येत नाही. याचे कारण असे की या ठिकाणी डेटा सर्विस किंवा मोबाईल सेवा देखील नाहीत. कृपया ही समस्या एकदाची मिटवाच."
 
 
बॉर्डरवर काय म्हणाले मोदी?
- पीएम नरेंद्र मोदी गुरुवारी काश्मिरच्या एलओसी येथील गुरेज सेक्टरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी जवानांना मिठाई खाऊ घातली. तसेच आपणच माझे कुटुंबीय आहात अशी भावना व्यक्त केली. 
- पीएम मोदी म्हणाले, "मला आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. सण आणि उत्सवांच्या वेळी सीमेवर जवानांची उपस्थिती उमेदीचे दीप प्रज्वलित करते. हे दीप मलाच नाही तर करोडो भारतीयांना एक ताकद देतात.
- जवानांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर मोदींनी ट्वीट केले. त्यामध्ये मोदी म्हणाले, "तुमच्यासोबत (जवान) वेळ घालवल्याने मला एक ऊर्जा मिळते. आम्ही चर्चा केली आणि एकमेकांना मिठाई दिली. मला हे जाणून खूप आनंद झाला, की जवान दररोज योगा करतात."
बातम्या आणखी आहेत...