आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात ओएमसी छोटे वीजनिर्मिती प्रकल्प उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात सुमारे 90 कोटी मोबाइल वापरकर्ते आहेत. वाटेल तेव्हा कॉल करण्यासाठी सेल्युलर नेटवर्कची एक संपूर्ण मालिकाच सक्रिय असते. हे जाळे सक्रिय राहण्यासाठी महत्त्वाच्या मोबाइल टॉवर्ससाठी 24 तास वीजपुरवठा आवश्यक असतो. शहरांमध्ये तर कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र, ग्रामीण भागात विजेचा तुटवडा असल्यामुळे 60 टक्क्यांहून अधिक मोबाइल टॉवर्स डिझेल जनरेटर्सवर चालतात. अशा परिस्थितीत ओएमसी पॉवर कंपनी ग्रामीण भागात टेलिकॉम कंपन्यांसाठी छोटे छोटे वीजनिर्मिती प्रकल्प उभारत आहे.

यासाठी सूर्य, हवा आणि बायोगॅससारख्या स्रोतांचा वापर करून जैव ऊर्जा उपलब्ध करून दिली जाणार आहे. भविष्यात ऊर्जेच्या वापरात मोठे बदल दिसून येणार आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या ठिकाणांची गरज भागवणारे संयंत्र तयार करण्याचा उद्देश असल्याचे ओएमसीचे अधिकारी अनिल राज यांनी सांगितले.

विशेष म्हणजे देशात चार लाखांहून अधिक मोबाइल टॉवर्स असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील दूरसंचार उद्योगासाठी वर्षाला दोन अब्ज लिटर डिझेल वापरले जाते. त्यामुळे दूरसंचार खात्यानेही कंपन्यांना डिझेलसाठी नवा पर्याय शोधण्याचे आदेश दिले आहेत.